ताज्या घडामोडीमनोरंजनमहाराष्ट्रमुंबई

‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप

मालिकेत प्रेक्षकांना समाधी सोहळा 22 ते 28 जुलैदरम्यान मिळणार पहायला

मुंबई : कलर्स मराठी वाहिनीवरील ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ या लोकप्रिय मालिकेत आजवर बाळूमामांच्या अनेक लीला प्रेक्षकांना पाहायला मिळाल्या. विविध रूपात अन् विविध अवतारात बाळूमामांनी त्यांच्या अद्भुत लीलांनी त्यांच्या भक्तांना आणि प्रेक्षकांना अनेकदा अचंबित केलं आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील प्रेक्षकांनी मालिकेवर भरभरून प्रेम केलं. गेली अनेक वर्षे या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. पण आता ही लोकप्रिय भक्तिरसपूर्ण मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत आहे. बाळूमामांच्या अनाकलनीय आणि अवाक् करणाऱ्या चरित्रातील अनेक प्रसंग प्रेक्षकांना ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ या मालिकेत पाहायला मिळाले. शिवशंकराचा अवतार मानल्या जाणाऱ्या बाळूमामांचा नवा अवतार प्रेक्षकांना चांगलाच भावला.

महाराष्ट्र ही संताची भूमी. महाराष्ट्राच्या भूमीवर अनेक थोर संत होऊन गेले, त्यातलेच एक महत्त्वपूर्ण नाव म्हणजे संत बाळूमामा. संत बाळूमामांनी भक्तीबरोबरच समाजप्रबोधन, समाजकल्याणचं खूप मोठं कार्य केलं. कलर्स मराठीवर काही वर्षांपूर्वी सुरू झालेली ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ ही मालिका संपूर्ण महाराष्ट्रभर तूफान गाजली. या मालिकेतील संत बाळूमामांचं बालपणातलं रूप आणि त्यांच्या बाललीलांनी रसिकांना अल्पावधीतच भुरळ घातलीचं. पण मोठ्या रूपातील बाळूमामांनी ज्यांनी आपल्या अस्तित्वाने अकोळसारख्या छोट्या गावात आणि गावकऱ्यांमध्ये चैतन्य फुलवलं. त्या रूपालादेखील संपूर्ण महाराष्ट्राने भरभर प्रेम दिलं.

‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ या मालिकेच्या शेवटच्या भागात इलाज करायला आलेल्या डॉक्टरांना बाळूमामांनी परत पाठवून समाधी घेतल्याचं पाहायला मिळेल. एकंदरीतच बाळूमामांच्या प्रपंच्याचा, त्यांच्या अपार प्रेमाचा, गोरगरिबांचा कैवार घेत त्यांच्या हितासाठी केलेल्या त्यागाचा, विलक्षण वैराग्याचा साक्षात्कार प्रेक्षकांना घडला. अवघा महाराष्ट्र ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ या जयघोषाने दुमदुमला. ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ या मालिकेत प्रेक्षकांना समाधी सोहळा 22 ते 28 जुलैदरम्यान पहायला मिळणार आहे. संध्याकाळी 6.30 वाजता कलर्स मराठीवर आणि कधीही जिओ सिनेमावर पाहता येईल.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button