Manoj Kumar Passes Away | अभिनेता मनोज कुमार यांचं वयाच्या ८७ व्या वर्षी निधन

Manoj Kumar | ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांचं निधन झालं आहे. चित्रपट दिग्दर्शक आणि अभिनेत मनोज कुमार यांना त्यांच्या देशभक्तीवरील चित्रपटांसाठी ओळखलं जातं. वयाच्या ८७ व्या वर्षी त्यांनी मुंबईतल्या धीरुभाई अंबानी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.
उपकार, क्रांती यांसह अनेक चित्रपटांमधून त्यांनी भूमिका केल्या. दिग्दर्शनही केलं. त्यांना भारत कुमार असंही म्हटलं जाई ते याच कारणामुळे. त्यांच्या चित्रपटांमधली गाणी आजही लोकांच्या स्मरणात आहेत. मेरे देश की धरती सोना उगले, उगले हिरे, मोती या गाण्याशिवाय तर १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी हे दोन राष्ट्रीय सण साजरेही होत नाहीत. याच मनोज कुमार यांनी जगाचा निरोप घेतला आहे.
हेही वाचा : पिंपरी-चिंचवडमधील ‘इको टुरिझम पार्क’ला वन मंत्र्यांचा ‘बुस्टर’
गेल्या अनेक वर्षांपासून मनोज कुमार यांनी चित्रपटांमधून काम करणं सोडलं होतं. मात्र त्यांनी अभिनय केलेले चित्रपट लोकांच्या स्मरणात आजही आहेत. ‘सहारा’, ‘हनीमून’, ‘पूरब और पश्चिम’, ‘मेरी आवाज सुनो’, ‘नसीब’, ‘नीलकमल’, ‘पत्थर के सनम’ अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केलं होतं. मनोज कुमार यांना नॅशनल अवॉर्ड, पद्मश्री पुरस्कार आणि दादासाहेब फाळके पुरस्कार देऊनही गौरवण्यात आलं होतं. त्यांच्या निधनाच्या बातमीने चित्रपटसृष्टी हळहळली आहे.