ताज्या घडामोडीमनोरंजन

अभिनेता गोविंदा याने हैराण करणारा खुलासा केला

गोविंदाला मारण्यासाठी घराबाहेर लोकं बंदूक घेऊन उभे असायचे…

मुंबई : बॉलिवूड अभिनेता गोविंदा गेल्या अनेक वर्षांपासून झगमगत्या विश्वापासून दूर आहे. कोणत्या सिनेमात गोविंदा दिसत नसला तरी रिएलिटी शोमध्ये परीक्षकाच्या भूमिकेत अभिनेता दिसतो. गेल्या काही दिवसांपासून गोविंदा घटस्फोटामुळे देखील चर्चेत आहे. पण यावर गोविंदा, पत्नी सुनीता अहुजा किंवा कुटुंबियांनी अधिकृत घोषणा केलेली नाही. अशात नुकताच झालेल्या एका मुलाखतीत गोविंदा याने हैराण करणारा खुलासा केला आहे. अभिनेत्या जीवेमारण्यासाठी कट रचण्यात आलं होतं. शिवाय गोविंदाला मारण्यासाठी घराबाहेर लोकं बंदूक घेऊन उभे असायचे…

मुलाखतीत गोविंदा म्हणाला, ‘मी 100 कोटी रुपयांच्या सिनेमाला नकार दिला. आजही मला त्या नकाराचा पश्चाताप होतो. आरशात पाहिल्यानंतर मी आज स्वतःच्या कानशिलात लगावतो. मी स्वतःलाच म्हणालो, किती मुर्ख आहेस तू.. त्या पैशांनी तू तुझा खर्च भागवला असता. सध्या ज्या भूमिका प्रेक्षकांना आवडतात तीच भूमिका मला साकारायची होती. पण कधीही आपल्या मनाचं ऐकायला हवं… शिवाय प्रामाणिक देखील असायला हवं…’

हेही वाचा –  शहरातील फेरीवाल्यांना फेरीवाला प्रमाणपत्र वाटप सुरू

गोविंदा याच्याविरोधत रचण्यात आला कट
राजकारणात येण्याच्या आपल्या निर्णयाबद्दल बोलताना गोविंदाने दावा केला की बॉलीवूडमधील लोकांनी अभिनेत्या विरोधात कट रचला. ‘माझी बदनामी सुरु होती आणि हे सर्व पूर्वनियोजीत होतं. त्यांना मला इंडस्ट्रीमधून बाजूला काढायचं होतं. मला समजलं की हे सर्व सुशिक्षित लोक आहेत आणि मी एक अशिक्षित बाहेरचा माणूस म्हणून माझ्या विरोधात कट रचण्यास सुरुवात झाली.

‘माझ्यासोबत अनेक गोष्टी घडू लागल्या. मी त्यांची नावे घेऊ शकत नाही कारण मी इंडस्ट्रीत केलेल्या कामामुळे मी अजूनही जिवंत आहे. माझ्यासोबत कट रचल्यावर हत्येचा प्रयत्न सुरू झाला. अनेकांना घराबाहेर बंदुकांसह पकडण्यात आले. अनेक लोक मारण्यासाठी वेगवेगळे मार्ग काढू लागले. मग षड्यंत्रानंतर माझी वागणूक बदलली… असं देखील अभिनेता म्हणाला.

गोविंदाच्या सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, 2019 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘रंगिला’ सिनेमानंतर अभिनेता कोणत्यात सिनेमात दिसला नाही. आता अभिनेता तीन सिनेमांच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. विनोदवीर कपील शर्मा याच्या शोमध्ये अभिनेता आगामी तीन सिनेमांबद्दल घोषणा केली. आता चाहते अभिनेत्याच्या तीन सिनेमांच्या प्रतीक्षेत आहेत.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button