अमृता खानविलकरचा ‘हा’ स्टंट पाहून तिच्या आईच्या काळजाचा ठोका चुकला

मराठी कलाविश्वातील एनर्जेटिक अभिनेत्री अमृता खानविलकर मराठी चित्रपटांप्रमाणेच अनेक बॉलिवूड चित्रपटातही झळकली आहे. केवळ चित्रपटचं नाही तर मालिका आणि रिएलिटी शोमध्येही तिने तिचा दबदबा निर्माण केला.अशाच एका रिएलिटी शो मधला अमृताचा स्टंट पाहून अमृतच्या आईचा काळजाचा ठोका चुकलाआणि तिने डोक्याला हात लावला …
अमृता ‘खतरों के खिलाडी’च्या 10 व्या पर्वात सहभागी झाली आहे. या शोमध्ये सहभागी होणारी अमृता ही मराठी कलाविश्वातील पहिली अभिनेत्री आहे. त्यामुळे तिची जोरदार चर्चा सुरु आहे.काही दिवसापूर्वीच सुरु झालेल्या या पर्वामध्ये अमृता वेगवेगळे स्टंट करताना दिसत आहे. मात्र ती ज्या जिद्दीने जीवावर बेतणारे स्टंट करत आहे ते पाहून तिच्या आईने चक्क डोक्याला हात लावल्याचं दिसून येत आहे.एवढच नाही तर हा स्टंट पाहता तिच्या आईने तो तेवढाच एन्जॉयही केला…
‘खतरों के खिलाडी’चा भाग प्रसारित झाल्यानंतर हा भाग तिच्या आईने पाहिला. या भागात अमृता जीव घेणा स्टंट करत होती. हा स्टंट पाहिल्यावर अमृताची आई थबकून गेली आणि त्यांनी डोक्याला हात लावला. अमृताने तिच्या आईचे हे चेहऱ्यावरील भाग व्हिडीओमध्ये कैद केले असून हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.