ताज्या घडामोडीमराठवाडामहाराष्ट्र

बीड तालुक्यात दहावीचा इंग्रजी पेपर फुटला; एका प्रश्नाची २० रुपयांना झेरॉक्स

बीड |  बीड तालुक्यातील साक्षाळपिंप्री गावामध्ये शिक्षण विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्न निर्माण करणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. काल झालेला इंग्रजीचा पेपर फुटला असून एका झेरॉक्स सेंटरवर एका प्रश्नाच्या उत्तराची झेरॉक्स २० रुपयाला विकली जात होती.ल साक्षाळपिंप्री गावामध्ये शिक्षण विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्न निर्माण करणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. काल झालेला इंग्रजीचा पेपर फुटला असून एका झेरॉक्स सेंटरवर एका प्रश्नाच्या उत्तराची झेरॉक्स २० रुपयाला विकली जात होती. यावेळी सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या पथकाने छापा टाकला असता हा सर्व धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

गेल्या १५ मार्चपासून इयत्ता १० वीच्या परीक्षेला सुरुवात झाली आहे. काल १९ मार्च रोजी इंग्रजीचा पेपर होता. बीड तालुक्यातील साक्षाळपिंप्री येथील केंद्रावर परीक्षा सुरू असताना, संजय मुरलीधर पालवे रा.उक्कडपिंप्री, ता. गेवराई याच्या झेरॉक्स सेंटरमधून उत्तरांच्या प्रती विक्री केले जात होते. यादरम्यान कुमावत यांच्या पथकाने झेरॉक्स सेंटरवर छापा टाकण्यात आला होता. यावेळी प्रश्न क्र. ३ व ४ च्या झेरॉक्स प्रती २० रुपयांना एक याप्रमाणे विक्री केले जात असल्याचे निदर्शनास आले आहे. यादरम्यान झेरॉक्स चालकाला ताब्यात घेत, त्याच्याकडे मिळून आलेल्या,२ प्रश्नांच्या प्रत्येकी ८० प्रती अशा एकूण १६० प्रतीसह झेरॉक्स यंत्रही जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button