breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

एनकाउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांना १२ जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी

मुंबई – एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना मनसुख हिरेन प्रकरणात १२ जुलैपर्यंत न्यायलयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. सध्या एनआयएकडून त्यांची चौकशी सुरू असून या प्रकरणात ते आरोपी असल्याचं बोललं जात आहे.

प्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी सापडली होती. ही गाडी व्यवसायिक मनसुख हिरेन यांची होती. मात्र, काहीच दिवसांनी मनसुख हिरेन यांचा मृतदेह ठाण्यातील खाडीत सापडला. त्यामुळे या प्रकरणाला वेगळंच वळण लागलं. एनआयए या प्रकरणात चौकशी करत आहे. प्रदीप शर्मा बर्‍याच दिवसांपासून राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या रडारवर होते पण तपास एजन्सीकडे प्रदीप शर्माविरूद्ध ठोस पुरावे नव्हते. या प्रकरणात नुकताच अटक करण्यात आलेल्या संतोष आत्माराम शेलार आणि आनंद जाधव यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे एनआयएने गुरुवारी पहाटे प्रदीप शर्माकडे चौकशी केली आणि समाधानकारक उत्तर न मिळाल्याने त्यांना अटक करण्यात आली.

या प्रकरणात, मुंबई पोलिसांचे एपीआय सचिन वाझे हे मुख्य सूत्रधार असल्याचे समोर आले होते. एनआयएने एप्रिलपर्यंत या प्रकरणात मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग, माजी चकमकी तज्ञ प्रदीप शर्मा यांच्यासह अनेक डीसीपी आणि २५ पेक्षा जास्त लहान-मोठ्या पोलिसांचीही चॊकशी केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button