breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन

‘शेरनी’च्या ट्रेलरनंतर अनेक वनाधिकाऱ्यांनी व्यक्त केल्या भावना

अमेझॉन प्राईम व्हिडीओने नुकतेच विद्या बालन अभिनीत चित्रपट ‘शेरनी’च्या बहुप्रतीक्षित ट्रेलरचे अनावरण केले. ट्रेलरला प्रेक्षकांच्या पसंतीची पावती मिळत असून प्रदर्शित झाल्याच्या काही तासातच अनेक महिला वन अधिकाऱ्यांनीदेखील सोशल मीडियावर आपले विचार व्यक्त केले. विद्या बालन यात एका प्रामाणिक महिला वन अधिकारी- विद्याची भूमिका साकारत आहे.

या चित्रपटासाठी आणि या रोमांचक ट्रेलरसाठी विद्याला जे प्रेम मिळते आहे ते अलौकिक आहे. काही वन अधिकाऱ्यांनी या ट्रेलरवर प्रतिक्रिया देताना विद्या बालनच्या अनोख्या भूमिकेमुळे आणि असामान्य कथेमुळे खूप प्रभावित झाल्याचे म्हटले आहे. प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया नेहमीच एका अभिनेत्यासाठी महत्त्वपूर्ण असतात मात्र, वास्तविक आयुष्यातील वन अधिकाऱ्यांनी केलेले कौतुक, ज्या लोकांवर हा चित्रपट चित्रित आहे, विद्या बालनसाठी हा अवर्णनीय क्षण आहे.

आपल्या पितृसत्ताक पद्धतीत सामाजिक अडथळे निर्माण करणारी मानवी श्वापदे वावरत असतात, विद्या ज्या विभागात कार्यरत असते, तिथली उदासीनताच तिला जोशाने स्वत:ची धमक सिद्ध करण्याची ऊर्जा देते. सिनेमाचा ट्रेलर रोमांचक असून विद्याच्या प्रवासावर भाष्य करतो. हे जग चमत्कारी, आपल्या अनुभवाशी साधर्म्य असणाऱ्या व्यक्तिरेखांनी भरलेले आहे. आपली चाकोरी बाहेरची नोकरी सांभाळून विद्या विवाहित आयुष्य जगत असते. हे करत असताना मानव नावाच्या पशूचा सामना तिला करावा लागतो. या सिनेमात शरद सक्सेना, मुकुल चड्ढा, विजय राझ, इला अरूण, ब्रिजेंद्र काला आणि नीरज काबी यांच्या मुख्य भूमिका असतील.

टी-सिरीज आणि अबंडनतिया एंटरटेनमेंटची निर्मिती असलेल्या या मस्ट वॉच प्रकारातील नाट्याचे दिग्दर्शन समीक्षकांच्या कौतुकास प्राप्त ठरलेल्या न्यूटन’फेम, पारितोषिक विजेता फिल्ममेकर अमित मसुरकर याने केले आहे. व्यंगावर बोट ठेवणाऱ्या आपल्या शैलीसाठी अमित प्रसिद्ध आहे. प्राईम सदस्य ‘शेरनी’ 18 जून पासून अमेझॉन प्राईम व्हिडीओवर स्ट्रीम करू शकतील.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button