breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

Election 2022 Guidelines : 22 जानेवारीपर्यंत निवडणूक प्रचारसभा, मेळावे आणि रोडशो, बाईक रॅलीवर बंदी

नवी दिल्ली | टीम ऑनलाइन

कोरोना महामारी आणि ओमायक्रॉन संकटामध्ये उत्तर प्रदेशसह पाच राज्यांच्या निवडणूका होत आहेत. येथील निवडणुकांच्या तारखांची घोषणा करताना निवडणूक आयोगाने 15 जानेवारीपर्यंत रॅली, सभा, रोड शो, साईकल आणि बाईक रॅलीवर बंदी घातली होती. ही मनाई निवडणूक आयोगाने २२ जानेवारीपर्यंत कायम ठेवली आहे. शनिवारी निवडणूक आयोगाने याबाबतची माहिती दिली. कोरोना संसर्गाचे आकडे वाढत असल्याने निवडणूक आयोगाने हा महत्वाचा निर्णय घेतला. बंद हॉलमध्ये 300 जण अथवा एकूण क्षमतेच्या 50 टक्कें लोकांच्या उपस्थितीत मेळावा घेण्यास निवडणूक आयोगाने अनुमती दिली आहे. कोरोना महासाथीच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये निवडणूक आयोगाने निर्बंध लागू केले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मतदानाचा कालावधी एक तासाने वाढण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. तसेच प्रचारादरम्यान कोरोना नियमांचं पालन करणे बंधनकारक असेल.

तसेच निवडणूक आयोगाने सर्व पक्ष आणि उमेदवारांना डोअर टू डोअर प्रचारासाठी परवानगी दिली आहे. तसेच व्हर्च्युअल माध्यमातून उमेदवारांन प्रचार करता येणार आहे. काही पक्षांनी तर याची सुरुवात देखील केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मतदानाचा कालावधी एक तासाने वाढण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. मतदान केंद्रावर असणारे सर्व कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण झालेले असेल. डिजिटल, व्हर्च्युअल पद्धतीने प्रचार करावा, असेही निवडणूक आयोगाने सांगितले.

कोणत्या राज्यात कधी मतदान?
उत्तर प्रदेश
पहिला टप्पा – 10 फेब्रुवारी रोजी मतदान
दुसरा टप्पा – 14 फेब्रुवारी 2022 रोजी मतदान
तिसरा टप्पा – 20 फेब्रुवारी 2022 रोजी मतदान
चौथा टप्पा – 23 फेब्रुवारी 2022 रोजी मतदान
पाचवा टप्पा – 27फेब्रुवारी 2022
सहावा टप्पा – 3 मार्च 2022 रोजी मतदान
सातवा टप्पा – सात मार्च 2022 रोजी मतदान

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button