breaking-newsTOP NewsUncategorizedताज्या घडामोडीमहाराष्ट्र

#Election: आशिष शेलार नवी मुंबई महापालिका निवडणूक प्रभारी, भाजपची तयारी

महानगरपालिका निवडणुकीसाठी राजकीय पक्षांची जय्यत तयारी सुरू झाली आहे. भाजपनेही आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठीच्या जबाबदारीचे वाटप केले आहे. आशिष शेलार यांना नवी मुंबई पालिका निवडणुकीसाठी प्रभारी म्हणून नेमले आहे. गणेश नाईक आणि मंदा म्हात्रे या दोघांमध्ये समतोल राखत पालिका निवडणुका जिंकून द्यायचे आव्हान आता आशिष शेलार यांच्यापुढे आहे. तर इतर महापालिका निवडणुकीसाठी मुख्य जबाबदारी आणि प्रभारी यांचे वाटप भाजपने निश्चित करत निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली आहे.

मुंबईत मंगळवारी (5 जानेवारी) भाजप महाराष्ट्र कोअर कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीत आगामी ग्रामपंचायत, महापालिका निवडणुकीची रणनीती ठरवण्यात आली. आगामी काही दिवसात नवी मुंबई, औरंगाबाद, कोल्हापूरसह पाच महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर योग्य उमेदवारांची निवड करणे, इतर पक्षातील उमेदवारांना भाजपत प्रवेश देऊन त्यांना उमेदवारी देणे यावर चर्चा झाली. बहुतांश महापालिकेत भाजपने स्वबळावर निवडणूक लढण्याची तयारी केली आहे. पण काही ठिकाणी शक्य असेल तर स्थानिक आघाडी करुन भाजप निवडणूक लढणार आहे.

2022 मध्ये होणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपने कांदिवली पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार अतुल भातखळकर यांची प्रभारी म्हणून निवड केली होती.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button