Uncategorizedताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्यानंतर एकनाथ शिंदे पहिल्यांदाच महाराष्ट्राच्या दौऱ्यावर

शिक : मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्यानंतर एकनाथ शिंदे पहिल्यांदाच महाराष्ट्राच्या दौऱ्यावर निघाले आहेत. मध्यरात्री दोन वाजता शिंदेंचं नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात आगमन झालं. यावेळी शिंदे गटातील आमदार आणि माजी कृषिमंत्री दादा भुसे यांच्यासह समर्थकांनी मुख्यमंत्र्यांचं जोरदार स्वागत केलं. यावेळी डीजे बंद करायला लावत शिंदेंनी माईकचा वापर न करता उपस्थितांशी खणखणीत आवाजात संवाद साधला. मालेगावचे नागरिक शिंदेंकडून मोठं गिफ्ट मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत.

एकनाथ शिंदे यांच्या महाराष्ट्र दौऱ्यातून राज्यभरात जोरदार शक्तीप्रदर्शन करण्याची तयारी कार्यकर्त्यांनी केली आहे. मुख्यमंत्री आज नाशकात असून मालेगावात एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पाच जिल्ह्यांची आढावा बैठक होणार आहे. बैठकीनंतर मालेगावच्या कॉलेज मैदानावर कार्यकर्ता मेळावा पार पडेल. यावेळी शिंदे गटाची ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला जाईल.

मालेगावच्या नागरिकांना मुंबईला येण्याचं निमंत्रण एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिलं. एकनाथ शिंदे दौऱ्यात नाशिक जिल्ह्याचं विभाजन करुन स्वतंत्र मालेगाव जिल्ह्याची घोषणा करणार का, याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे.

ओपन रुफ कारमधून हात उंचावत शिंदेंनी समर्थकांचे आभार मानले. तर शिंदेंच्या पाठिराख्यांनी जेसीबीमधून त्यांच्यावर पुष्पवृष्टी केली. त्यानंतर डीजे बंद करायला लावत एकनाथ शिंदेंनी उपस्थितांशी खणखणीत आवाजात संवाद साधला, तोही माईकचा वापर न करता.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या तीन दिवसीय दौऱ्याला नाशिकपासून सुरुवात झाली. नाशिककडे जाताना पडघा, शहापूर आणि इगतपुरी येथे त्यांच्या स्वागताचे कार्यक्रम पार पडले. नाशिकमध्ये घोटी टोलनाक्यापासूनच त्यांचं जंगी स्वागत करण्यात आले. यानंतर शहरातील पाथर्डी फाटा येथे त्यांना भव्य हार घालून शहरात त्यांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर पाथर्डी फाटा येथील छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला त्यांनी अभिवादन केले. तर मुंबई नाका येथे हजारो लोकांनी रात्री 12 वाजता त्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत केले. आज मुख्यमंत्री मालेगाव आणि नाशिक या शहरांबाबत आढावा बैठक घेऊन या दौऱ्याला सुरुवात करणार आहेत.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button