पिंपरी / चिंचवड

भोसरीत चार दिवसात पाण्याचे आठ मीटर चोरीला

पिंपरी | प्रतिनिधी

भोसरी परिसरात चोरट्यांनी आता पाण्याच्या मीटरला टार्गेट केले आहे. मागील चार दिवसात आठ मीटर चोरीला गेले आहेत. याप्रकरणी नागरिकांनी भोसरी पोलिसांकडे तक्रार दिली आहे.

भगतवस्ती, भोसरी येथे हे मीटर चोरीचे प्रकार सुरू आहेत. बजरंग कावडे, ज्ञानेश्वर येवले, बाळकृष्ण फाकटकर, दौलत शेख, प्रभाकर कोरडे, रामदास पवार, जुलेखा शेख, शकुंतला जाधव या नागरिकांच्या नळाचे पाण्याचे मीटर मागील चार दिवसात चोरीला गेले आहेत.

पिंपरी चिंचवड शहरात वाहनचोरी, घरफोडी, कंपन्यांमधील साहित्याची चोरी, लूटमार, जबरी चोरी, दरोडे यांसारख्या घटना सातत्याने सुरू आहेत. या घटना रोखण्यात पोलिसांना अपयश येत असतानाच चोरट्यांनी आता पाण्याचे मीटर चोरण्याचे प्रकार सुरू केले आहेत. यामुळे नागरिकांना नाहक भुर्दंड सहन करावा लागत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button