ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

व्यावसायिकाची आठ लाखांची फसवणूक; 52 टन साखर देण्याचा बहाणा

पिंपरी चिंचवड |  पिंपरी-चिंचवड मधील एका व्यापा-याला 52 टन साखर देतो, असे सांगून सांगली येथील साखर कारखान्यावर ट्रक बोलावून घेतल्या. साखर भरून दिली आहे, असे सांगून व्यावसायिकाकडून आठ लाख 12 हजार रुपये बँक खात्यावर घेत साखर न देता फसवणूक केली. ही घटना 24 डिसेंबर 2021 ते 11 मार्च 2022 या कालावधीत चिंचवड येथे घडली.

शाम सादू गायकवाड (वय 50, रा. दिघी) यांनी याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एका महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे व्यावसायिक आहेत. आरोपी महिलेने त्यांना 52 टन साखर देण्याचे आमिष दाखवले. साखर देण्यासाठी महिलेने यशवंत शुगर एंड पॉवर प्रा ली नागेवाडी, ता. खानापूर, जि. सांगली येथे साखर घेण्यासाठी गाडी पाठवून देण्यास महिलेने सांगितले. त्यानुसार गायकवाड यांनी दोन ट्रक साखर कारखान्यावर पाठवून दिल्या.

दोन ट्रकमध्ये 52 टन साखर भरली आहे असे सांगून गायकवाड यांना बँक अकाउंटवर पैसे भरण्यास सांगितले. त्यानुसार गायकवाड यांनी आठ लाख 18 हजार 224 रुपये बँक खात्यावर जमा केले. मात्र गायकवाड यांना साखर न देता महिलेने त्यांची फसवणूक केली. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button