breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

एकनाथ खडसेंना ईडीची नोटीस; भोसरी प्रकरणात चौकशी होणार?

जळगाव – राज्याचे माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या मुक्ताईनगर येथील निवासस्थानी जाऊन सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) समन्स बजावले आहे. मात्र ते नेमके कोणाला बजावले याची माहिती मिळालेली नाही. ईडीच्या अधिकाऱ्यांनी खडसेंच्या मुक्ताईनगरमधील फार्म हाऊसच्या गेटवर हे समन्स चिटकवले आहे. दरम्यान, भोसरी जमीन प्रकरणी हे समन्स असल्याची चर्चा आहे.

जळगावच्या मुक्ताईनगर येथील फार्महाऊसवर बुधवारी दुपारी ईडीचे पथक दाखल झाले. तेव्हा तिथे कोणीही नसल्यामुळे या पथकाने फार्म हाऊसच्या गेटवर समन्स चिटकवले. त्यामुळे ते नेमके कोणाला पाठवले आहे, याची माहिती कळलेली नाही. एकनाथ खडसे कामानिमित्त बाहेर गेले आहेत. असे असताना फार्म हाऊस किंवा कोथळी येथील निवासस्थानी कोणतीही नोटीस आली नसल्याची माहिती ऍडव्होकेट रोहिणी खडसे-खेवलकर यांनी दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button