breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

अनिल देशमुखांच्या पुत्राला ईडीचे समन्स; आज चौकशीला हजर राहण्याचे आदेश

मुंबई – वसुली प्रकरणात राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीकडून अटक झाल्यानंतर आता त्यांचा मुलगा ऋषिकेश देशमुख यांना चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले आहे. अनिल देशमुख यांचे पैशाचे सर्व व्यवहार मुलगा ऋषिकेश पाहत असल्याचे तपासात उघड झाले, त्यामुळे ईडीने ऋषिकेश यांना काल रात्री उशिरा समन्स बजावून आज दिवाळी पाडव्याच्या दिवशी सकाळी ११ वाजता मुंबईतील ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. आता ऋषिकेश देशमुख ईडीसमोर उपस्थित राहणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

ऋषिकेश देशमुख यांना यापूर्वीही दोनदा ईडीने बोलावले होते. मात्र त्यांच्या वडिलांप्रमाणेच तेही मनी लाँड्रिंगच्या चौकशीसाठी केंद्रीय पथकासमोर हजर राहिले नव्हते. तर अनिल देशमुख यांना पाचवेळा ईडीने समन्स बजावले होते. यावेळी सुरुवातीला त्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्यांचा जबाब नोंदवण्याची मागणी ईडीकडे केली आणि नंतर प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचे कारण देत पाचही वेळा ते ईडीसमोर आले नाहीत. अखेर १ नोव्हेंबर रोजी ते अचानक ईडी कार्यालयात दाखल झाले. ईडीच्या अधिकाऱ्यांसमोर हजर होण्याची त्यांची ही पहिलीच वेळ होती. यावेळी जवळपास १२ तासांच्या चौकशीनंतर ईडीने त्यांना अटक केली कारण ते ईडीच्या प्रश्नांना उत्तर देण्यास टाळाटाळ करत होते. ईडीने विशेष कोर्टाकडे त्यांची १४ दिवसांची कोठडी मागितली होती. मात्र कोर्टाने त्यांना ६ नोव्हेंबरपर्यंत कोठडी सुनावली आहे. म्हणजेच दिवाळीचा संपूर्ण आठवडा त्यांना तुरुंगात काढावा लागणार आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button