ताज्या घडामोडीमुंबई

रश्मी ठाकरे यांच्या भावाच्या कंपनीवर ईडीकडून छापेमारी, ६ कोटींची संपत्ती जप्त

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून ईडी सक्रीय झाली असून अनेकांवर कारवाई सुरू आहे. त्यातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांचे बंधू श्रीधर पाटणकर यांच्या पुष्पक ग्रुपची ६ कोटी ४५ लाखांची संपत्ती ईडीने जप्त केली आहे. ठाण्यामधील निलांबरी प्रोजेक्टमधील ११ फ्लॅट्स ईडीकडून जप्त करण्यात आले आहेत.

या कारवाईमुळे शिवसेना आणि भाजप यांच्यात पुन्हा एकदा वाद उफाळून येण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडी सरकारमधील अनेक नेत्यांवर कारवाई होत असल्याने शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षाने भाजपवर निशाणा साधला आहे. त्यातच आता खुद्द उद्धव ठाकरे यांच्या मेव्हण्यावर कारवाई झाल्याने वाद चिघळण्याची शक्यता आहे. दरम्यान, आज राज्याचे मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्यावर अटकेच्या कारवाईनंतर आता सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मंगळवारी (ता.२२) सकाळपासून कुर्ला परिसरात छापेमारी केली. ईडी अधिकाऱ्यांसह सीआरपीएफचे जवानही कुर्ल्यात दाखल झाले आहेत. कुर्ल्यातील गोवावाला कंपाउंडसह अन्य ठिकाणी ही छापेमारी सुरु असल्याची माहिती मिळते.

तर, दुसरीकडे प्राप्तीकर खात्याकडून मुंबईतील हिरानंदनी समूहाच्या मालमत्तांवरही छापे टाकण्यात आले आहेत. करचुकवेगिरी प्रकरणात ही छापेमारी करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. हिरानंदनी समूहाच्या मुंबई, बंगळुरू आणि चेन्नईतील एकूण 24 मालमत्तांवर छापेमारी सुरु करण्यात आल्याची माहिती मिळते. प्राप्तीकर खात्याच्या कारवाईने बांधकाम क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button