breaking-newsताज्या घडामोडीदृष्टीक्षेपपश्चिम महाराष्ट्रपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्रराजकारणराष्ट्रिय

पोलीस भरतीसाठी आधी सरकार अनुत्सुक आता अर्ज भरण्याचे संकेतस्थळ होतेय हँग

मुंबई । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी ।
नुकत्याच जाहीर झालेल्या पोलीस भरती प्रक्रियेत
सतराशे साठ विघ्न येत आहेत. आधीच तीन वर्षे लांबलेली भरतीप्रक्रिया उशिराने सुरू झाली आहे. त्यातच, संकेतस्थळावर तांत्रिक अडचणी निर्माण होत असल्याने उमेदवारांना अर्ज भरताना अडचणी येत आहेत. अर्ज भरण्याची अंतिम तारीख ३० नोव्हेंबर म्हणजेच उद्या आहे. त्यामुळे पोलीस भरतीसाठी अर्ज करण्याची मुदत वाढवून द्यावी, अशी मागणी उमेदवारांकडून करण्यात येतेय. तसंच, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाडांनीही १५ दिवस मुतदवाढ देण्याची मागणी केली आहे.

राज्यात जवळपास 20 हजार पोलीस भरती केली जाणार आहे. उमेदवारांना अर्ज भरण्यासाठी शेवटची तारीख 30 नोव्हेंबर आहे. यासाठी उमेदवार अधिक मेहनत घेत आहेत, अशात अर्ज भरण्याची वेबसाइट्च हँग होत असल्याने उमेदवारांना इंटरनेट कॅफेवरच रात्र जागून काढावी लागत आहे.

काय आहेत अडचणी?
राज्य सरकारने नोव्हेंबर 2020 मध्ये पोलीस भरतीची घोषणा केली, मात्र ही भरती प्रक्रिया कोरोना संसर्गामुळे पुढे ढकलली. त्यानंतर, १ नोव्हेंबर २०२२ पासून भरतीप्रक्रिया सुरू होणार होती. मात्र, त्यालाही स्थगिती देण्यात आली. आता अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे, मात्र मागील तीन वर्षांपासून भरतीसाठी प्रयत्न करणाऱ्या अनेक उमेदवारांचे अर्ज करण्याचे वय उलटून गेले, त्यामुळे भरती प्रक्रियेतील वय वाढवून देण्याची मागणी राज्य सरकारने मान्य केली. त्यानंतर प्रक्रिया सुरू झाली. अशा परिस्थितीत उमेदवार आता रात्रंदिवस मेहनत घेऊन भरतीची तयारी करत आहेत. मात्र या भरतीची ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी संकेतस्थळावर तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने उमेदवारांवर मोठे संकट ओढावले आहे, त्यामुळे राज्य सरकारने अर्ज भरण्यासाठी मुदत वाढ द्यावी अशी मागणी अनेक उमेदरवार करत आहेत. मात्र यावर राज्य सरकार काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

https://twitter.com/Awhadspeaks/status/1597479297069256704?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1597479297069256704%7Ctwgr%5E78db8e653f8defb2dfc3b606a764a1ffadb9a727%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.mymahanagar.com%2Fmaharashtra%2Ffirst-government-is-reluctant-for-police-recruitment-now-website%2F511188%2F

जितेंद्र आव्हाड काय म्हणाले?
पोलिस भरतीसाठी राज्यातील लाखो तरुण तयारी करत आहेत. ही भरती त्यांच्यासाठी आशेचा किरण आहे. असे असताना तांत्रिक अडचणींमुळे या तरुणांना फॉर्म भरताना अडचणी येत आहेत. त्यांचे फॉर्म सबमिट होत नाहीयेत अथवा फॉर्म भरतीची प्रक्रिया पूर्ण होत नाही आहे. आज फॉर्म भरण्याचा शेवटचा दिवस असल्याचे समजले. राज्य सरकारला विनंती आहे की त्यांनी, या तरुणांच्या भविष्याचा विचार करून, फॉर्म भरण्याची मुदत वाढवून द्यावी. यासोबतच सदर फॉर्म भरताना येणाऱ्या तांत्रिक अडचणी देखील दूर कराव्यात. या तरुणांच्या भविष्यासाठी राज्य सरकार 15 दिवस तरी नक्की मुदतवाढ देईल अशी खात्री आहे, असं ट्विट जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button