पिंपरी / चिंचवड

निगडीत भर दिवसा 65 वर्षीय वृद्धाने केला अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

पिंपरी l प्रतिनिधी
निगडी मधील चिकन चौकाजवळ 65 वर्षीय व्यक्तीने त्याच्या 28 वर्षीय साथीदारासोबत मिळून 12 वर्षीय मुलीसोबत लैंगिक अत्याचार केले. हा धक्कादायक प्रकार सोमवारी (दि. 30) दुपारी तीन ते चार वाजताच्या कालावधीत घडला.

राजेश शिवमूर्ती सरवदे (वय 65, रा. ओटास्कीम, निगडी), काळूराम बाबू पवार (वय 28, रा. ओटास्कीम, निगडी) अशी लैंगिक अत्याचार करणा-या आरोपींची नावे आहेत. त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी पिडीत मुलीच्या आईने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी पिडीत 12 वर्षीय मुलीला चिकन चौकाजवळ रस्त्याच्या बाजूला असलेल्या मातीच्या ढिगा-याच्या आडोशाला नेले. तिथे दोघांनी पिडीत मुलीवर लैंगिक अत्याचार केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. हा धक्कादायक प्रकार भर दिवसा दुपारी तीन ते चार वाजताच्या कालावधीत घडला आहे. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button