breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

माजी नगरसेवक जितेंद्र ननावरे यांच्या सतर्कतेमुळे अखेरच्या क्षणी उपचार भेटले…‘त्या’ महिलेचे प्राण वाचले!

पिंपरी । प्रतिनिधी 

कोणत्या घरात भांडणं होत नाहीत ? सर्वच घरात भांडणं होतात यात जीव देण्यापर्यंत ची वेळ येऊ न देणे हे गरजेचं असतं गेल्या आठवड्यात माझ्या महात्मा फुले नगर मध्ये असाच प्रकार घडला पती-पत्नीच्या भांडणांमध्ये पत्नीने गळफास लावण्याचा प्रयत्न केला झाला. काय आहे प्रकार सविस्तर वाचा माजी नगरसेवक जितेंद्र ननावरे यांच्या शब्दांत…

मी महात्मा फुले नगर मधील माझा मित्र सहकारी रवींद्र ओव्हाळ याच्या मेव्हन्याचे लग्न उरकून माझ्या कार्यकर्त्यां बरोबर माझ्या कार्यालयाच्या दिशेला चाललो होतो तेवढ्यात माझ्या गाडीत बसलेल्या शंकर डिडूळ या कार्यकर्त्याला त्याच्या पत्नी चा फोन आला आणि पलीकडून तिने  सांगितले आपल्या शेजारच्या महिलेने गळफास घेतला आहे. तुम्ही लवकर जितुभाऊना घेऊन इकडे या जसा त्याला कॉल आला तो जोरातओरडला जितुभाऊ गाडी वळवून घ्या एका महिलेने फाशी घेतली आहे हे ऐकल्या नंतर डोकं चाललं नाही घटना तशी धक्कादायक होती काय करावे काही सुचेना गाडी वळून आणायला उशीर होईल म्हणून गाडी जोरात शंभर सव्वाशे मीटर रिव्हर्स मागे नेली. तोपर्यंत तिच्या घरच्यांनी निपचीत पडलेल्या महिलेला रस्त्यापर्यंत आणलं होतं तातडीने त्या महिलेला त्याच क्षणी माझ्या गाडीत टाकायला सांगितले. क्षणाचाही विलंब न करता गाडी सुसाट दवाखान्याच्या दिशेला काढली रस्त्यात तिचे नातेवाईक तिला जोरजोरात ओरडून तिच्या नावाने हाका मारून जागे करायचा प्रयत्न करत होते. नातेवाईक पुरते हादरून गेले होते या गोष्टीने मीही  पूर्ण गांगरून गेलो होतो.या गडबडीत अवघ्या दोनच मिनिटात मी गाडी वाय.सी.एम.हॉस्पिटलला पोचवली.

***

महिला तीन महिन्यांची गरोदर…

तातडीने एखाद्या व्यक्तीला शेवटच्या क्षणी जे उपचार हवे असतात ते उपचार वाय.सी.एम हॉस्पिटलचे (सीएमओ) डॉ.मुंडे यांनी त्या महिलेला दिले. मला वाटतं तिने गळफास घेतल्यानंतर तिला अवघ्या दहाव्या मिनिटाला वैद्यकीय उपचार मिळाले होते. तिथे गेल्यावर आम्हाला कळले की ती महिला तीन महिन्यांची गरोदर आहे. मिळालेल्या तातडीचे उपचाराने ती महिला अर्ध्या तासानंतर पूर्ण शुद्धीवर आली. डॉ.मुंडे म्हणाले की जर अजून थोडा उशीर झाला असता तर कदाचित आपण तिला वाचू शकलो नसतो. नातेवाईकांना महिला शुध्दीवर आल्याने खूप आनंद झाला.मी सुटकेचा निश्वास टाकला कारण एक नाही दोन जीव वाचले होते.नातेवाईकांनी मी तत्परता दाखवत त्या महिलेला दवाखान्यात आणले म्हणुन अतिशय गलबलून माझे आभार मानले.माझा ही ऊर थोडा भरून आला कारण आपल्यामुळे दोन जीव वाचल्याचे वेगळ समाधान मला लाभलं होतं.

सदर घडलेला प्रकार अतिशय गंभीर होता. भांडण कोणाच्या घरात नसतात सर्वांच्याच घरात असतात जिथे भांडण नाही तो संसार ही नाही.

पत्नी तिच्या लग्नानंतर आई वडील सोडून सासरी आलेली असते लग्नानंतर पती हाच तिचा सर्वस्व असतो पतीने देखील तिच्याशी योग्य वागणूक व सन्मान होईल असंच वागलं पाहिजे

***

नागरिकांना आवाहन…

समाजातील प्रत्येक घटकाला मला हेच सांगायचे आहे ती पती पत्नीचे भांडण होत असतात जीव देणे हा पर्याय नसतो आपल्या अशा कृत्यामुळे आपल्या पुर्ण कुटुंबाला नाहक त्रास सोसावा लागतो.कृपया अशी कोणतीही टोकाची भूमिका आपण घेऊ नका कारण माणूस हा चुकीचा पुतळा आहे. चुका होतच असतात त्या छोट्याशा चुकीची शिक्षा आपला जीव देणे ही कदापि नाही  आपण ही गंभीर चूक कधीच करू नका, असे आवाहनही जितेंद्र ननावरे यांनी केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button