breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिंचवडमधील सर्वपक्षीय सतर्कतेमुळेच ‘स्पर्श’चा भांडा फुटला!

‘स्पर्श’वरील कारवाईमुळे शहरवासीयांमध्ये समाधान
राजकीय जोडे बाजुला ठेवून एकोप्याने धडा शिकवला

पिंपरी । विशेष प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवडमधील गोरगरिब रुग्णांना उपाचारासाठी पैसे वसुली करणाऱ्या ‘स्पर्श’ संस्थेच्या व्यवस्थापनावर प्रशासनाने कारवाई केली. कोरोनाच्या महामारीत मुजोरी करणाऱ्यांचा शहरातील सर्वपक्षीय नेत्यांच्या सतर्कतेमुळेच भांडाफोड झाला. चुकीच्या कृत्याबद्दल पक्षभेद विसरुन एक होणाऱ्या या मंडळींच्या भूमिकेवर सर्वसामान्य पिंपरी-चिंचवडकरांमधून समाधान व्यक्त होत आहे.
मात्र, ‘स्पर्श’च्या आडून खिसेभरुपणा करणारी राष्ट्रवादीची ‘ती’ नगरसेविका आणि भाजपाचा ‘स्मार्ट’ नगरसेवक अद्याप मोकाट का? असा प्रश्न शहरवासीयांना पडला आहे.
भोसरी येथील कोविड केअर सेंटरचे व्यवस्थापन असताना ‘स्पर्श’ संस्थेकडून खोटी बीले सादर करण्यात आली. याविरोधात माजी आमदार विलास लांडे यांनी आवाज उठवला. त्यानंतर ऑटो क्लस्टर कोविड केअर सेंटरमधील मनमानीचा विषय चव्हाट्यावर आला.
वास्तविक, नगरसेवक कुंदन गायकवाड आणि विकास डोळस ही जोडगोळी म्हणजे भोसरीचे आमदार तथा भाजपाचे शहराध्यक्ष महेश लांडगे यांचे निष्ठावंत आहेत. महापालिकेत भाजपाची सत्ता आहे. पण, तरीही गायकवाड- डोळस जोडीने ‘स्पर्श’वर पुराव्यानिशी पहिला वार केला. आमदार लांडगे या संपूर्ण घडामोडीत शांत होते. याचा अर्थ आमदार लांडगे यांची गायकवाड- डोळस जोडीला मूक संमती होती, असे स्पष्ट होते.
दरम्यान, महापालिका सर्वसाधारण सभेमध्ये राष्ट्रावादीचे ज्येष्ट नगरसेवक योगेश बहल यांनी अक्षरश: हल्लाबोल केला. ‘स्पर्श’ च्या कारभाराचे वाभाडे काढीत सभागृहाचे लक्ष वेधले. भाजपाच्या ज्येष्ट नगरसेविका सीमा सावळे यांनी महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना खडे बोल सुनावले. एव्हढेच नाही, तर आयुक्त कारवाई करणार नसतील, तर आयुक्तांवर गुन्हा दाखल करु, असा इशाराही दिला.
शिवसेना नगरसेवक राहुल कलाटे, राष्ट्रवादीचे विरोधीपक्ष नेते राजू मिसाळ, नगरसेवक अजित गव्हाणे, भाजपाचे नगरसेवक संदीप वाघेरे, यांच्यासह अपक्ष आघाडीतील नगरसेवकांनीही ‘स्पर्श’च्या कारभाराविरोधात नाराजी व्यक्त केली. या सर्व पक्षीय लोकप्रतिनिधींनी केलेल्या उठावामुळेच प्रशासनाला ‘स्पर्श’वर कारवाई करावी लागली.
पिंपरी विधानसभेचे गणित..?
‘स्पर्श’ शी संबंधित चर्चेत असलेली राष्ट्रवादीची ‘ती’ नगरसेविका पिंपरी विधानसभा मतदार संघातील आहे, अशी चर्चा आहे. ‘स्पर्श’च्या कारभाराचे वाभाडे काढणारे राष्ट्रवादीचे ज्येष्ट नगरसेवक योगेश बहल, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, ज्येष्‍ठ नगरसेविका सीमा सावळे, नगरसेविका अनुराधा गोरखे, नगरसेवक विकास डोळस, नगरसेविका आशा शेडगे, माजी नगरसेवक जितेंद्र ननावरे आदी सर्व मंडळी पिंपरी विधानसभा मतदार संघातील प्रभागांचे नेतृत्त्व करतात. २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत तिकीटावरुन घोळ झाला होता. संबंधित नगरसेविका विधानसभा निवडणुकीसाठी स्पर्धेत आहे. मात्र, राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्याला ‘नाकापेक्षा मोती जड’ होवू द्यायचा नाही. आगामी विधानसभा निवडणुकीत राजकीय महत्त्वाकांक्षेतून संबंधित नगरसेविकेचा ‘करेक्ट कार्यक्रम’ करण्यात आल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button