breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रपिंपरी / चिंचवडराजकारण

दवा और दुवा काम आयी : पिंपरी-चिंचवडच्या राजकारणातील ‘किंग इज बॅक’

  • चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा
  • ‘त्या’व्हीडिओमुळे हजारो कार्यकर्त्यांना जीव भांड्यात पडला

पिंपरी । विशेष प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवडच्या राजकीय पटलावरील ‘बेताज बादशाह’ आणि भाजपाचे नेते आमदार लक्ष्मण जगताप यांच्या प्रकृतीमध्ये कमालीची सुधारणा झाली आहे. हजारो कार्यकर्त्यांची दुवा आणि दवा दोन्ही कामाला आले. जगताप यांनी रुग्णालयाच्या दालनातून हात उंचावून दिलासा दिला. त्यामुळे ‘किंग इज बॅक’ असा जयघोष करीत कार्यकर्ते, हितचिंतकांनी आनंद साजरा केला.

आमदार जगताप गेल्या महिन्यापासून बाणेर येथील खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. अमेरिकेहून मागविलेल्या इंजेक्शनमुळे त्यांच्या प्रकृतीत लक्षणीय सुधारणा झाली आहे. आता ते खुर्चीत बसू व काही पावले चालूही लागले आहेत. प्रकृतीत लक्षणीय सुधारणा झाल्याने आमदार जगतापांना आठवड्याभरात रुग्णालयातून घरी सोडले जाऊ शकते, असे शंकर जगताप यांनी म्हटले  आहे. तर, जगताप आता लिक्वीड डायट घेऊ लागले आहेत, असे त्यांचे दुसरे बंधू विजय जगताप म्हणाले.

अमेरिकेहून मागविलेल्या इंजेक्शनमुळे बंधूंच्या प्रकृतीत लक्षणीय सुधारणा झाल्याचे त्यांनी सांगितले. कालच जगतापांना या इंजेक्शनचा आणखी एक डोस देण्यात आला. ते गेल्या महिन्याच्या १२ तारखेपासून रुग्णालयात दाखल आहेत. २० एप्रिलला त्यांचा व्हेंटीलेटर काढल्याने त्यांचे नातेवाईक आणि कार्यकर्त्यांचा जीव भांड्यात पडला होता.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button