मुंबई

वैद्यकीय उपकरणांच्या विक्रीसाठी औषधविक्री परवान्याची गरज नाही

मुंबई | वैद्यकीय उपकरणांची विक्री करण्यासाठी नोंदणीकृत, परवानाधारक औषधविक्रेता असण्याची गरज नाही. बारावी उत्तीर्ण असलेली व्यक्ती वैद्यकीय उपकरणांची विक्री करू शकते अशी तरतूद केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने केली आहे. औषध आणि सौंदर्य प्रसाधन कायदाच्या वैद्यकीय उपकरण नियमातील बदलांचा मसुदा जाहीर केला असून सरकारच्या या निर्णयाला राज्यातील औषधविक्रेत्यांनी विरोध दर्शवला.

औषध आणि सौंदर्य प्रसाधन कायदा १९४० अंतर्गत वैद्यकीय उपकरण नियम २०१७ लागू केले आहेत. या नव्या नियमानुसार यापुढे वैद्यकीय उपकरणांची विक्री करण्यासाठी नोंदणीकृत आणि एफडीए (अन्न आणि औषध प्रशासन) परवानाधारक औषधविक्रेता असण्याची गरज नसेल. आतापर्यंत वैद्यकीय उपकरणांची विक्री ही नोंदणीकृत आणि परवानाधारक औषधविक्रेत्यांच्या माध्यमातून केली जात असे. यासंबंधीचे नियमही कडक आहेत. केंद्राचे हे नवीन नियम लागू झाले तर वैद्यकीय उपकरणांच्या दर्जाचा, फार्मसी शिक्षणाच्या अवमूल्यनाचा प्रश्न निर्माण होईल असे नमूद करून राज्यातील औषधविक्रेत्यांनी नाराजी व्यक्त केली. हा नियम लागू झाल्यास औषधविक्रेत्यांच्या व्यवसायाच्या संधी कमी होणार आहेत. दुसरीकडे वैद्यकीय उपकरणांच्या दर्जाचाही प्रश्न निर्माण होणार आहे. त्यामुळे या निर्णयाला आमचा विरोध आहे, असे महाराष्ट्र रजिस्टर्ड फार्मासिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष कैलास तांदळे यांनी सांगितले. या मसुद्यावर सूचना, हरकती मागविण्यात आल्या आहेत. त्यानुसार त्या नोंदविणार आहोत. त्याचा विचार झाला नाही आणि हा नियम लादला गेला तर आमच्यासमोर आंदोलनाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button