breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

मुंबईसह महाराष्ट्रात ड्रोन हल्ल्याचं सावट

मुंबई | प्रतिनिधी 
आतापर्यंत महाराष्ट्राच्या बाहेरच ड्रोन हल्ल्याची भीती व्यक्त केली जात असताना आता मुंबई आणि महाराष्ट्रावरही ड्रोन हल्ला होणार असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. ही माहिती चौकशी यंत्रणांना कळल्यानं पोलीस यंत्रणा खडबडून जागी झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जम्मू काश्मीर आणि पंजाबमध्ये ड्रोन हल्ल्यांची भीती नेहमीच व्यक्त केली जाते. पण मुंबई आणि महाराष्ट्रात ड्रोन हल्ल्यांबाबत कोणत्याही प्रकारची भीती बाळगण्याजोगी परस्थिती समोर आली नव्हती. मात्र आता याबाबतचे संकेत संभाषण चौकशी यंत्रणांना कळल्यानं पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रातच असे काही घडले तर आपल्याकडे अँटी-ड्रोन यंत्रणाही नाही. महाराष्ट्र सायबर पोलिसांनीही ही बाब मान्य केली आहे. त्यामुळे आता मुंबईला हादरवून टाकणारं डार्क नेटचं कारस्थान पुन्हा एकदा समोर आलं आहे. जम्मू कश्मीर आणि पंजाबमध्ये ड्रोनमुळे असणाऱ्या संभावित भीतीबाबत कायम बोललं जातं. मात्र,आता संरक्षण यंत्रणांनी मुंबई आणि महाराष्ट्रात ड्रोन हल्ल्यांबाबतचं संभाषण पकडले आहे. यापेक्षा गंभीर बाब म्हणजे, भविष्यात असे काही घडले तर महाराष्ट्रात अँटीड्रोन सिस्टमही नाहीये.

महाराष्ट्र सायबर आयजी यशस्वी यादव यांनी यासंदर्भात माहिती दिली. ते म्हणाले की, “दहशतवादी सहानुभूती बाळगणारे ड्रोन हल्ले, रासायनिक हल्ले आणि सायबर हल्ल्यांबद्दल डार्क नेटवर बोलताना दिसतात. पृष्ठभागाच्या जाळ्याच्या तुलनेत डार्क नेट ९९% आहे. टोर ब्राउझर डार्क नेटमध्ये वापरला जातो, जो सहज पकडता येत नाही. कारण त्यात अनेक प्रॉक्सी बाऊन्सिंगचा वापर केला जातो. दरम्यान, मुंबईसह इतर महत्त्वाच्या शहरांवर ड्रोन हल्ल्यांबाबत अनेकदा अलर्ट दिले जातात असेही त्यांनी सांगितले आहे.त्यामुळे महाराष्ट्रात लवकरात लवकर ड्रोनविरोधी यंत्रणा बसवणं गरजेचं असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button