ताज्या घडामोडीमुंबई

डॉ. आंबेडकर स्मारकाचे काम २०२४मध्ये पूर्णत्वास

 

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून नियोजन

 मुंबई |दादरमधील इंदू मिलच्या जागेवर उभारण्यात येत असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाची इमारत आणि पुतळ्याची उभारणी वगळता प्रकल्पाचे ४९.५ टक्के काम पूर्ण झाले आहे. तर स्मारकाच्या इमारतीच्या कामाला सुरुवात झाली असून आतापर्यंत ६.६५ टक्के काम पूर्णत्वास गेले आहे. मार्च २०२४ मध्ये स्मारकाचे काम पूर्ण करण्याचे नियोजन मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून करण्यात आले आहे.

दादर येथील इंदू मिलच्या १२ एकर जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ४५० फूट उंचीच्या स्मारकाची उभारणी केली जात आहे. यामध्ये १०० फूट उंचीची स्मारकाच्या पादपीठाची इमारत उभारण्यात येणार असून त्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ३५० फूट उंचीचा पुतळा उभारला जाणार आहे. सद्यस्थितीत स्मारकाच्या इमारतीचे जवळपास ८० फुटांपर्यंतचे काम पूर्ण झाले आहे. तर पुतळ्याच्या अंतर्गत भागातील स्ट्रक्चरल स्टीलच्या निर्मितीचे काम कारखान्यात सुरू करण्यात आले आहे. इमारत पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष पुतळा उभारणीच्या कामाला सुरुवात होणार आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

या प्रकल्पाच्या कामाला फेब्रुवारी २०१८ मध्ये सुरुवात झाली होती. त्यावेळच्या नियोजनानुसार पुढील ३६ महिने म्हणजेच फेब्रुवारी २०२१ मध्ये प्रकल्पाचे काम पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र प्रकल्पाच्या कामाला विलंब झाल्याने आता २०२४ पर्यंत स्मारकाचे काम पूर्ण होणार आहे. २०१७ मध्ये या प्रकल्पासाठी ७६३ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित होता. मात्र २०२० मध्ये प्रकल्पाच्या स्मारकाची उंची ३५० फुटांवरून ४५० फुटांपर्यंत वाढविण्यात आली. त्यामुळे प्रकल्पाच्या खर्चातही भरघोस वाढ झाली असून तो एक हजार कोटी रुपयांवर पोहचला आहे.

प्रकल्पाची ठळक वैशिष्ट्ये

– इंदू मिलच्या परिसरातील तळ्याची सुधारणा आणि सुशोभिकरण करून महाडच्या चवदार तळ्याची प्रतिकृती साकारली जाणार

– स्मारक इमारतीच्या पाठपीठामध्ये बौद्ध वास्तूरचना शैलीतील घुमट, चैत्यसभागृह, संग्रहालय असेल. तसेच यात प्रदर्शन भरविण्याची सोय असेल

– पुतळ्याच्या पायथ्याशी पोहोचण्यासाठी पादपीठात ६ मीटर रुंदीचा आंतरिक आणि बाह्य चक्राकार मार्ग प्रस्तावित आहे. यामध्ये विविध कलाकृती साकारल्या जाणार आहेत

– १००० नागरिक बसण्याच्या क्षमतेचे प्रेक्षागृहाची उभारणी. आर्टगॅलरी.

– १०० आसानी क्षमतेचे ४ संशोधन केंद्र वर्ग

– संशोधन केंद्रात सुसज्ज ग्रंथालयाची उभारणी

– विपश्यना केंद्र

– परिक्रमापथ

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button