Mahaenews

कोट्यवधी रुपयांच्या फसवणूक प्रकरणात डॉ डांगे यांची मानवी हक्क आयोगाकडे धाव

Dr. Dange ran to the Human Rights Commission in a multi-crore fraud case

Dr. Dange ran to the Human Rights Commission in a multi-crore fraud case

Share On

तळेगाव | एमआरआय मशीन विकण्याच्या बहाण्याने एका कंपनीच्या संचालकांनी तळेगाव येथील डॉ. श्रीहरी डांगे यांची दोन कोटी रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून तत्कालीन पोलीस आयुक्तांनी हस्तक्षेप केल्याने न्याय मिळाला नसल्याची तक्रार डॉ. डांगे यांनी महाराष्ट्र राज्य मानवीय हक्क आयोगाकडे केली आहे.मॅक्सीस हेल्थकेअर इमेजिंग (इंडिया) या कंपनीच्या संचालकांनी सन 2014-15 साली तळेगाव येथील डॉ. श्रीहरी डांगे यांची दोन कोटी चार लाख रुपयांची फसवणूक केली. यात डॉ. डांगे यांचे आर्थिक व मानसिक नुकसान झाले. दरम्यान, कंपनीच्या संचालकांनी डॉ. डांगे यांचे जगणे मुश्कील केले. याप्रकरणी डांगे यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे.

मात्र पुण्याच्या तत्कालीन पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी मध्यस्थी केल्याचा डांगे यांना संंशय आहे. त्यामुळे यात त्यांना योग्य न्याय मिळालेला नाही. त्यामुळे आपला मूलभूत हक्क मारला जात आहे. तरी मॅक्सीस हेल्थकेअर इमेजिंग (इंडिया) या कंपनीच्या संचालकांवर कारवाई करुन न्याय देण्याची मागणी डॉ. डांगे यांनी महाराष्ट्र मानवीय हक्क आयोगाकडे केली आहे.

Exit mobile version