पिंपरी / चिंचवड

चारित्र्यावर संशय घेऊन विवाहितेला ठेवले डांबून

पिंपरी l प्रतिनिधी
विवाहितेच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला घरामध्ये उपाशीपोटी डांबून ठेवले. हा प्रकार 10 सप्टेंबर 2021 ते 1 डिसेंबर 2021 या कालावधीत खेड तालुक्यातील वडगाव घेनंद येथे घडला.

संतराम रघुनाथ बवले (रा. वडगाव घेनंद, ता. खेड) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पीडित विवाहितेने आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी संतराम याने त्याच्या फिर्यादी पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला हाताने मारहाण केली. पत्नीला उपाशीपोटी घेऊन तिला घरात डांबून ठेवले. तिचा शारीरिक व मानसिक छळ केला. वारंवार अश्लील शिवीगाळ केली. घरातून हाताला धरून धक्के देऊन घराबाहेर काढले. तसेच तुझी गरज नाही, असे म्हणत तिला त्रास दिला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास आळंदी पोलीस करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button