breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

“मुंबईत बसून हवेत गोळीबार करू नका”, खासदार संजय राऊतांच्या आपल्याच पक्षाच्या सरकारला कानपिचक्या!

मुंबई |

शिवसेना खासदार आणि पक्षाचे प्रवक्ते संजय राऊत हे नेहमीच विरोधकांवर, विशेषत: भाजपावर परखड टीका करताना दिसतात. प्रसंगी त्यांनी महाविकास आघाडी सरकारमधील काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन मित्र पक्षांना देखील लक्ष्य केल्याचं दिसून आलं आहे. पण आता संजय राऊतांनी चक्क आपल्याच पक्षाच्या सरकाराला कानपिचक्या दिल्या आहेत. “सरकारने मुंबईत बसून हवेत गोळीबार करू नये”, असं राऊत म्हणाले आहेत. तसेच, “खरमरीत पत्र वगैरेच्या भानगडीत पडू नका, काही होत नाही”, असं देखील राऊतांनी ऐकवलं आहे.

  • नेमकं झालं काय?

काही दिवसांपूर्वी कर्नाटकच्या बेंगळुरूमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याचा प्रकार समोर आला होता. या घटनेचा निषेध करणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या ३८ लोकांवर कर्नाटक सरकारने कारवाईचा बडगा उगारला आहे. तसेच, त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची तयारी चालवली आहे. यावर संजय राऊतांनी आक्षेप घेत आपल्याच पक्षाच्या सरकारला सुनावलं आहे.

  • “भाजपाशासित राज्यात देशद्रोह स्वस्त”

भाजपाशासित राज्यात देशद्रोह स्वस्त झाल्याचं यावेळी राऊत म्हणाले. “बेळगावमध्ये आजही महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते तुरुंगात आहेत. त्यांचा गुन्हा एवढाच आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाल्यानंतर त्यांनी रस्त्यावर येऊन आंदोलन केलं. तुम्ही गुन्हे दाखल करू शकता, पण त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला जातो. शिवाजी महाराजांच्या अपमानाचा निषेध करणं हा भाजपाची सत्ता असलेल्या राज्यात देशद्रोहासारखा गुन्हा होऊ शकतो का? भाजपाशासित राज्यात देशद्रोह स्वस्त झालाय. काहीही झालं की देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला जातो”, असं राऊत म्हणाले आहेत.

  • राज्य सरकारला दिला सल्ला…

“महाराष्ट्र सरकारने ही बाब गांभीर्याने घेतली पाहिजे. मुंबईत बसून उगाच हवेत गोळीबार करू नये. त्यांनी हे खरमरीत पत्र वगैरे लिहिण्याच्याही भानगडीत पडू नये. काही होत नाही. एक तर तुम्ही महाराष्ट्रात कठोर पावलं उचला. आणि या ३८ तरुणांना त्यांची कायदेशीर बाजू मांडण्यासाठी राज्य सरकारने वकील द्यावा अशी या आंदोलनातला कार्यकर्ता म्हणून माझी मागणी आहे”, असं राऊत म्हणाले.

  • पंतप्रधान काशीमध्ये महाराजांचं नाव घेतात, आणि…

“जेव्हा राजकारण करायचं असतं, तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी काशीमध्ये शिवाजी महाराजांचं नाव घेतात आणि इथे छत्रपती शिवाजी महाराजांसोबत जे लोक उभे राहतात, त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल होणं हे चालणार नाही”, असंही राऊत म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button