ताज्या घडामोडीमुंबई

मुंबईचं निर्जंतुकीकरण करण्याच्या मोहिमेत मुंबई महापालिकेला डोमेक्सचा आधार

मुंबई | डोमेक्सने दिलेल्या या पाठिंब्यासंबंधी बोलताना मुंबई पालिकेचे एल विभागाचे सहायक आयुक्त मनिष वळंजू यांनी म्हटलं आहे की, करोनाच्या दुसऱ्या लाटेने आपल्या सर्वांनाच सुरक्षेत अजिबात हलगर्जी केली जाऊ शकत नाही याची जाणीव करुन दिली आहे. स्वत:ला आणि आपल्या प्रियजनांना सुरक्षित ठेवण्यासाठी सावधगिरी बाळगणे आणि सर्व उपाययोजना करणं महत्वाचं आहे. ही परिस्थिती हाताळण्यासाठी मुंबई पालिका तयार असून डोमेक्सने देणगी आणि निर्जंतुकीकरण मोहीमेच्या माध्यमातून दिलेल्या पाठिंब्यामुळे आम्हाला सर्व सार्वजनिक ठिकाणी निर्जंतुकीकरण प्रदान करण्यात आणि स्वच्छतेचे चांगले मानक राखण्यास मदत मिळत आहे. आम्हाला खरंच याचं कौतुक आहे.

०.५% सोडियम हायपोक्लोराइटसह डोमेक्स जंतुनाशक फ्लोअर क्लीनरने अमेरिकेतील मान्यताप्राप्त प्रयोगशाळेतील स्वतंत्र चाचण्याद्वारे केवळ १० सेकंदात करोना व्हायरस नष्ट करत असल्याचं सिद्ध केलं आहे. प्रख्यात तज्ज्ञ आणि विषाणूशास्त्रज्ञांनी देखील या अहवालांची पडताळणी आणि पुष्टी केली आहे. योगायोगाने, जगभरातील आघाडीच्या आरोग्य संस्थांनी पृष्ठभाग निर्जंतुकीकरणासाठी सोडियम हायपोक्लोराइटची शिफारस केली आहे.

फेब्रुवारी महिन्यात जेव्हा मुंबईची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाणारी लोकल जवळपास दहा महिन्यांनंतर सुरु करण्यात आली तेव्हा डोमेक्सने रेल्वेला आधार देत सीएसटी, ठाणे, दादर, बोरिवली, अंधेरी या गर्दीच्या स्थानकांवर निर्जंतुकीकरण केले. प्लॅटफॉर्म, तिकिट काऊंटर आणि इतर महत्वाच्या ठिकाणी नियमितपणे निर्जंतुकीकरण करण्यासाठी सहा सफाई तज्ज्ञांची टीम तैनात करण्यात आली होती.

ब्रॅण्डकडून प्रशासनाला मदत सुरु राहणार असून यावेळी ५० हजार लीटर जंतुनाशक फ्लोअर क्लीनर देणगी म्हणून दिलं जाणार आहे जेणेकरुन मैदानात उतरुन काम करणाऱ्या टीम्स जगभरातील आघाडीच्या आरोग्य संस्थांनी शिफारस केलेलं सोडियम हायपोक्लोराइट वापरुन निर्जंतुकीकरण प्रदान करतील. ब्रँण्ड संबंधित प्रभागातील सहाय्यक आयुक्तांसोबत काम करत असून तेथील प्रशासनाने शिफारस केलेल्या ठिकाणी जसे की कार्यालयं, बाजारपेठा, सार्वजनिक शौचालयं येथे आठवडाभरासाठी निर्जंतुकीकरण करण्यासाठी पाच तज्ज्ञांची टीम तैनात करण्याचा विचार करत आहे.

जवळपास गेल्या १०० वर्षांपासून ३५ देशांमध्ये हानिकारक जंतूंपासून कुटुंबांना सुरक्षा पुरवणारं डोमेक्स भारतालाही सुरक्षित ठेवण्यास कटिबद्ध आहे. करोना महामारीने शिखर गाठलं असताना मुंबई निर्जंतुकीकरण करण्यासाठी महापालिकेसारख्या सरकारी संस्थांशी भागीदारी करून डोमेक्सने करोनाविरोधातील लढाईला पाठिंबा दिला आहे. यासोबतच हॉस्पिटल / संस्था जिथे सोडियम- हायपोक्लोराइट आधारित गोष्टी वापरण्याची शिफारस करण्यात आली होती तिथे ९० लाखांचं उत्पादन देणगीच्या स्वरुपात देण्यात आलं. ही सुविधा देणारं डोमेक्स बाजारातील एकमेव ब्रँडेड फ्लोअर क्लीनर आहे.

लोक आता जास्त जागरुक झाले असून आपल्या घरासोबतच सार्वजनिक ठिकाणांचं देखील नियमितपणे निर्जंतुकीकरण व्हावं यासाठी सर्वोत्कृष्ट उपाय शोधत आहेत. उत्कृष्ट नवकल्पना आणि निर्जंतुकीकरण उत्पादनांची उत्कृष्ट वैद्यकीय श्रेणी यांच्या आधारे डोमेक्सने या आव्हानाला सामोरं गेलं आहे. महामारीदरम्यान उत्तम निर्जंतुकीकरण देण्याचा हेतू आणि दृढ भावनेने डोमेक्स सर्वात पुढे उभं राहून लोकांची सुरक्षा करत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button