पिंपरी / चिंचवड

मेंढपाळाने मारहाण केल्याने श्वानाचा मृत्यू

पिंपरी | प्रतिनिधी

मेंढपाळाने एका श्वानाला मारहाण केली. त्यात श्वानाचा मृत्यू झाला. याप्रकरणी मेंढपाळाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना रविवारी (दि. 19) रात्री पावणे बारा वाजता काटेवस्ती, पुनावळे येथे घडली.

राजूलाल देवकाते (रा. यवत) असे गुन्हा दाखल झालेल्या मेंढपाळाचे नाव आहे. याप्रकरणी धनश्री सुरेश शिंदे (वय 24, रा. काटेवस्ती, पुनावळे) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा मेंढपाळ आहे. तो मेंढ्या घेऊन पुनावळे येथे आला होता. त्याने एका श्वानाला काठीने बेदम मारले. त्यात त्या श्वानाचा मृत्यू झाला. याप्रकरणी मेंढपाळ देवकाते याच्या विरोधात भारतीय दंड विधान कलम 429, महाराष्ट्र प्राण्यांना निर्दयतेने वागवणारा कायदा 1960 कलम 11 (अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हिंजवडी पोलीस करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button