breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट! महागाई भत्त्यात ३ टक्के वाढ

नवी दिल्ली – सरकारी कर्मचाऱ्यांचे राहणीमान आणखी सुधारण्यासाठी महागाई भत्ता दिला जातो. वाढत्या महागाईनंतरही कर्मचाऱ्याच्या राहणीमानावर परिणाम होऊ नये, म्हणून तो वेळोवेळी वाढवला जातो. याच पार्श्वभूमीवर आता मोदी सरकारने केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना दिवाळीची मोठी भेट दिली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने महागाई भत्त्यात ३% वाढ करण्यास मंजूरी दिली आहे. या निर्णयाचा ५० लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे. केंद्राच्या बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर लवकरच याची अधिकृत घोषणा करणार असल्याचे समजते.

केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे महागाई भत्त्यात ३% वाढ झाल्यानंतर ७व्या वेतन आयोगानुसार, कर्मचाऱ्यांना त्यांच्या बेसिक सॅलरीवर ३१% डीए मिळेल.
आजच्या वाढीनंतर आता डीए ३१ टक्के असेल. यावर्षी जुलैमध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाने १ जुलैपासून केंद्र सरकारचे कर्मचारी आणि निवृत्ती वेतन धारकांसाठी महागाई भत्ता आणि महागाई (डीआर) दर ११ टक्के वाढवण्याचा निर्णय घेतला होता. यासह डीएचा नवीन दर १७ टक्क्यांवरून २८ टक्के करण्यात आला. त्याचबरोबर आज डीएमध्ये तीन टक्के वाढ झाल्यामुळे, डीएचा नवीन दर ३१ टक्के झाला आहे. म्हणजेच केंद्रीय कर्मचाऱ्यांना त्यांच्या मूळ वेतनाचा ३१ टक्के महागाई भत्ता मिळेल. कर्मचाऱ्यांच्या पगाराच्या आधारे महागाई भत्ता दिला जातो. हा भत्ता सरकारी कर्मचारी, सार्वजनिक क्षेत्रातील कर्मचारी आणि पेन्शनधारकांना दिला जातो.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button