ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

विभागीय व्यवस्थापक संतोष माने सेवानिवृत्त

पिंपरी चिंचवड | पुणे महानगर परिवहन महामंडळाचे (पीएमपीएमएल) विभागीय व्यवस्थापक संतोष माने नुकतेच सेवानिवृत्त झाले.पीसीएमटीचे पीएमपीएमएलमध्ये विलीनीकरण होण्यापूर्वी माने पीसीएमटीमध्ये भांडार विभागात कार्यरत होते. या ठिकाणी 20 वर्षे काम केल्यानंतर त्यांनी नोडल ऑफीसर अतिरिक्त आगार व्यवस्थापक, प्रशासन व मानव संशोधन विभागात 32 वर्षे काम केले. परिवहन विभागातील विविध प्रशिक्षण घेऊन त्यांनी पीसीएमटी, पीएमपीएमएल सुधारण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. शहरातील वाहतूक सुविधा सक्षण करण्यावर भर दिला.

प्रभावी नियोजन, डिझेल बचत केल्याबद्दल त्यांचा तत्कालीन महाव्यस्थापक नानासाहेब बोठे यांचा हस्ते सन्मान करण्यात आला. उत्कृष्ठ कामगिरी केल्याबाबत आमदार लक्ष्मण जगताप, तत्कालीन महाव्यवस्थापक नयना गुंडे यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला. त्याचबरोबर कोरोनाच्या कालावधीत उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल महापौर उषा ढोरे, आयुक्त राजेश पाटील यांनी प्रशस्तीपत्र देऊन माने यांचा गौरव केला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button