ताज्या घडामोडीविदर्भ

जिल्ह्यात प्रशासकीय कार्यालयात भ्रष्टाचाराची कीड

एकाच आठवड्यात दोन भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई

वाशिम : वाशिम जिल्ह्यात प्रशासकीय कार्यालयात भ्रष्टाचाराची कीड लागण्यास सुरुवात झाली आहे. एकाच आठवड्यात दोन भ्रष्ट अधिकाऱ्यांना लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पथकाने रंगेहाथ पकडले आहे. दोन दिवसांपूर्वी जिल्हा सामान्य रुग्णालयातील कक्ष अधीक्षकाने लाच स्वीकारल्याच्या वृत्ताची शाई सुकत नाही तोच जिल्हा उपनिबंधकांना तब्बल ६ लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आल आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार तक्रारदाराचा प्राथमिक चौकशीचा अहवाल तक्रारदार यांच्या बाजूने अनुकूल असा पाठविण्यासाठी तब्बल ६ लाख रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. सदर बाब वाशिमच्या तिरुपती सिटीत निदर्शनास आली. दिग्विजय राठोड, जिल्हा उपनिबंधक- वर्ग १ सहकारी संस्था असे लाच स्वीकारणाऱ्या भ्रष्ट अधिकाऱ्याचे नाव आहे.

प्राथमिक चौकशीचा अहवाल अनुकूल असा पाठविण्यासाठी तक्रारदाराला ९ लाख रुपयांची मागणी राठोड यांनी केली होती. यातील 2 लाख 50 हजार रुपये आधीच स्वीकारले गेले होते. तर उर्वरित ६ लाख ५० हजार देण्यासाठी राठोड यांनी मंगरूळपीर येथील तक्रारदार यांच्याकडे तगादा लावला होता. आरोपी राठोड उर्वरित रकमेची मागणी करत असल्याबाबत तक्रारदाराने ४ जून रोजी अकोला येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.

६ जून रोजी पडताळणी कारवाई दरम्यान आरोपी दिग्विजय राठोड यांनी तडजोडी अंती ६ लाख रुपये लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यावरून ६ जून रोजी रात्री ९ वाजता तिरुपती शहरातील सिल्व्हर अपार्मेंटमध्ये सापळा रचला तेव्हा हा भ्रष्टाधिकारी राठोड यांनी तक्रारदाराकडून रोख ६ लाख रुपयांची लाच स्वीकारताना दिसला. अधिकारी राठोडला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पंचांसमक्ष रंगेहाथ पकडले. तर त्याच्याविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ अन्वये ग्रामीण पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला.

एकाच आठवड्यात दोन भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई झाल्याने प्रशासकीय कार्यालयांत एकच खळबळ उडाली आहे. सदर कारवाई अकोला येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक सचिन सावंत यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक नरेंद्र खैरनार, पोलीस अंमलदार दिगंबर जाधव, अभय बायस्कर, संदीप ताले निलेश शेगोकर यांच्या पथकाने यशस्वी केली. यात लाचलुचपत प्रतिबंधक विभाग वाशिमचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी देखील सहकार्य केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button