पिंपरी / चिंचवड

पुनरुत्थान समरसता गुरुकुलम मधील विद्यार्थ्यांना सोलापुरी चादरीचे वाटप

– रतन टाटा, शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजन

पिंपरी l प्रतिनिधी

उद्योगपती रतन टाटा आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त श्री सिद्धिविनायक लोकसेवा संस्था प्रेमलोक पार्क व संदीप यशवंत शिंदे टाटा मोटर्स मित्रपरिवार यांच्या वतीने चिंचवड येथील पुनरुत्थान समरसता गुरुकुलम मध्ये शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांना सोलापुरी चादरीचे वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेस कामगार आघाडी विधानसभा चिंचवड उपाध्यक्ष संदीप शिंदे, टाटा मोटर्स युनियनचे उपाध्यक्ष नयन पालांडे, न्याय जनसेवा ट्रस्ट मानवाधिकार आयोग नवी दिल्लीचे पुणे जिल्हा अध्यक्ष रवींद्र फुलपगारे, पश्चिम महाराष्ट्र रहिवासी सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष रणजित औटे, माहिती अधिकार कार्यकर्ते श्रीराम परदेशी, सामाजिक कार्यकर्ते व पर्यावरण मित्र सदाशिव काळखैरे, विनोद कासार, सुबोध कणसे, भीमाशंकर डेंगळे, अजय जाधव, देविदास कटाळे, कानिफनाथ पाचोरे, डी एम माळी आदी उपस्थित होते.

चिंचवड येथील पुनरुत्थान समरसता गुरुकुलममध्ये अनाथ आदिवासी मुले निवासी शिक्षण घेतात. त्या मुलांना सोलापुरी चादर अर्थातच मायेचं पांघरुण घालण्यात आले. तसेच मुलांना खाऊचे वाटप करत नववर्षाचे स्वागत करण्यात आले. १ जानेवारी रोजी हा कार्यक्रम पार पडला. पुनरुत्थान समरसता गुरुकुलमचे अध्यक्ष गिरीश प्रभुणे यांना नुकतेच पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यानिमित्त गिरीश प्रभुणे यांचा सत्कार देखील संस्थेच्या वतीने करण्यात आला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button