पिंपरी / चिंचवड

मकर संक्रांती निमित्त भोसरीमध्ये तिळगुळ व पतंग वाटप

– पिंपरी चिंचवड शहर जिल्हा भाजपा महिला मोर्चा सरचिटणीस आणि गायत्री सखी मंचच्या अध्यक्षा कविता भोंगाळे-कडू यांच्यातर्फे आयोजन

पिंपरी l प्रतिनिधी

मकर संक्रांती निमित्त पिंपरी चिंचवड शहर जिल्हा भाजपा महिला मोर्चा सरचिटणीस आणि गायत्री सखी मंचच्या अध्यक्षा कविता भोंगाळे-कडू यांनी भोसरी येथे नागरिकांमधील आपुलकी आणि बालगोपाळांमधील जिव्हाळा वाढण्याच्या उद्देशाने दोन उपक्रम राबवले. कविता भोंगाळे-कडू यांच्या तिळगुळ वाटप आणि पतंग वाटपाच्या उपक्रमातून भोसरीतील नागरिक भारावून गेले.

कविता कडू म्हणाल्या, “सूर्याच्या मकर राशीतील प्रवेशाने साजरा होणारा मकर संक्रांतीचा सण आणि सुरु होणारे सूर्याचे उत्तरायण हे राज्यातील जनतेच्या जीवनात धन, धान्य, उत्तम आरोग्य, आनंदाची समृद्धी घेऊन येवो. समाजातील अज्ञान, असत्य, अंधश्रद्धेचा अंधकार यानिमिताने दूर होवो. मनातील, विचारातील कटुता संपून परस्परांमध्ये स्नेह, मैत्री, आपुलकी, बंधुत्वाची भावना वाढीस लागो. यंदाची मकर संक्रांत विश्वासाठी कोरोना मुक्तीची पाहत ठरो, अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या आहेत.

मकर संक्रांती जसे तिळगुळ देऊन गोड बोलण्याचा सण आहे, तसाच तो बालगोपाळांसाठी पतंग उडवण्याचा देखील सण आहे. या सणाच्या आनंदात आपणही सर्वांसोबत सामील व्हावे या उद्देशाने सर्व बाळगोपाळांना गायत्री सखी मंच व भारतीय जनता पक्ष महिला मोर्चा पिंपरी चिंचवड शहर जिल्हा यांच्या वतीने विनामूल्य पतंग वाटप करण्यात आले. पतंग उडवताना कुणीही नायलॉन मांजा वापरू नका, असे आवाहन आमदार महेश लांडगे यांनी केले.

भोसरी परिसरात आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली गायत्री सखी मंचच्या अध्यक्षा कविता कडू या कायम प्रत्येक सण, समारंभानिमित्त वैविध्यपूर्ण समाजोपयोगी उपक्रम राबवित असतात. त्यांच्या या सामाजिक उपक्रमांचा लाभ भोसरी परिसरातील नागरिक, बंधू भगिनी, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक यांना होत असतो, असे मत यावेळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी व्यक्त केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button