breaking-newsTOP Newsआरोग्यताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

भोसरीमध्ये मोफत सहाय्यक साधने वाटप व आरोग्य तपासणी शिबिर

माजी नगरसेवक विक्रांत लांडे यांच्या पुढाकारातून उपक्रम

पिंपरी ।प्रतिनिधी

राजमाता जिजाऊ महाविद्यालय, लांडेवाडी, भोसरी येथे ज्येष्ठांसाठी आरोग्य तपासणी शिबिर व मोफत सहाय्यक साधने वाटप तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे.२९, ३०, ३१ मार्च २०२२ रोजी हे शिबिर घेण्यात येणार आहे.

याबाबतची अधिक माहिती आयोजक व माजी नगरसेवक विक्रांत लांडे यांनी दिली ते म्हणाले, सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय, नवी दिल्ली, जिल्हा प्रशासन व जिल्हा परिषद, पुणे | यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई अपंग हक्क विकास मंच तसेच महात्मा गांधी सेवा संघ संचलित जिल्हा दिव्यांग पुर्नवसन केंद्र, पुणे यांच्या सहकार्याने हे शिबिर राबवण्यात येणार आहे. ६० व त्यापुढील वयाच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी राष्ट्रीय वयोश्री योजना अंतर्गत मोफत सहाय्यक साधने वाटपासाठी तपासणी शिबिर घेतले जाईल. या योजने अंतर्गत मोफत साहित्य व आरोग्य तपासणी शिबिर २९, ३०, ३१ मार्च २०२२ रोजी राजमाता जिजाऊ महाविद्यालय, लांडेवाडी, भोसरी येथे आयोजित केले आहे.

नाव नोंदणी स्थळ राजमाता जिजाऊ महाविद्यालय, लांडेवाडी आणि इंटीलिजंट कॅडेट स्कुल, इंद्रायणी नगर येथे करण्यात येईल. तपासणी नंतर एका व्यक्तिस एकापेक्षा जास्तही सहाय्यक साधने देण्यात येतील. अपेक्षित लाभार्थ्यांनी लागणाऱ्या साहित्यांची पूर्वनोंदणी राजमाता जिजाऊ महाविद्यालयात येऊन करावी व मिळालेला रजिस्टर नंबर स्वत:कडे ठेवावा.

*आवश्यक कागदपत्रे *
शिबिरासाठी येताना लाभार्थ्यांनी आधारकार्ड, रेशनकार्ड , उत्पनाचा दाखला ( तहसील / तलाठी) दोन पासपोर्ट फोटो जवळ ठेवावेत.

अधिक माहितीसाठी ऑनलाईन फॉर्म भरण्यास मदत हवी असल्यास ही सुविधा राजमाता जिजाऊ महाविद्यालयात उपलब्ध केली आहे.

ऑनलाईन फॉर्म भरण्याची मुदत २१ मार्च ते २७ मार्च २०२२ वेळ : सकाळी ९ ते दुपारी ३.०० वा. पर्यंत

अधिक माहितीसाठी संपर्क
9503030686/7559486890

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button