पिंपरी / चिंचवड

ओला, सुका कचरा वेगळा करण्यासाठी नागरिकांना डस्टबिनचे वाटप करा

– स्वीकृत नगरसदस्य दिनेश यादव यांची मागणी

– सहाय्यक आरोग्याधिका-यांना दिले निवेदन

पिंपरी l प्रतिनिधी

ओला आणि सुका कचरा गोळा करण्याचे पिंपरी-चिंचवड महापालिकेचे नियोजन सुरु आहे. त्यासाठी एक एजन्सीची नेमणूक करण्यात आली आहे. मात्र, नागरिकांना ओला आणि सुका कचरा टाकण्यासाठी डस्टबिन पुरवले तर एजन्सी आणि संबंधितांवरील ताण कमी येईल, यासाठी नागरिकांना डस्टबिन देण्यात यावेत, अशी मागणी स्वीकृत नगरसदस्य दिनेश यादव यांनी केली आहे.

स्वीकृत नगरसदस्य दिनेश यादव यांनी याबाबत फ क्षेत्रीय कार्यालयाचे प्रभारी सहाय्यक आरोग्याधिकारी तथा माहिती अधिकारी सुधीर वाघमारे यांना निवेदन दिले आहे. यादव यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ओला आणि सुका कचरा स्वतंत्रपणे साठवण्यासाठी अनेक नागरिक डस्टबिनची मागणी करीत आहेत. नागरिकांना डस्टबिनचे वाटप करण्यात यावे.

ओला आणि सुका कचरा वेगळा करण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेने एक एजन्सी नेमली आहे. एजन्सीच्या माध्यमातून अनेक ठिकाणी ओला कचरा आणि सुका कचरा वेगळा करण्याबाबत सांगितले जाते. नागरिकांना जर डस्टबिन वाटप केले तर त्या माध्यमातून नागरिक स्वतः ओला आणि सुका कचरा वेगळा करून देतील. ज्या एजन्सीला काम दिले आहे, त्यांनी त्यांच्या वतीने डस्टबिन वाटावेत. काही ठिकाणी स्टीलचे डस्टबिन बसवावेत, अशी मागणी वारंवार केली जात असूनही पालिकेकडून ती पूर्ण केली जात नसल्याचे स्वीकृत नगरसदस्य दिनेश यादव म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button