पिंपरी / चिंचवड

नळाचे पाणी भरण्याच्या कारणावरून दोन गटात वाद : परस्पर विरोधात गुन्हे दाखल

पिंपरी l प्रतिनिधी

नळाचे पाणी भरण्याच्या कारणावरून सहयोगनगर तळवडे येथे दोन गटात वाद झाला. तिघांनी मिळून एका व्यक्तीला जातीवाचक शिवीगाळ केली. याप्रकरणी मारहाण आणि अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच याच्या परस्पर विरोधात देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना रविवारी (दि. 20) दुपारी घडली.

सुरेश परिहार, प्रकाश सुरेश परिहार आणि महिला (सर्व रा. सहयोगनगर, तळवडे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी विजय नागनाथ दाखले (वय 32, रा. सहयोगनगर, तळवडे) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी हे एकमेकांच्या शेजारी राहण्यास आहेत. नळाचे पाणी भरण्यावरून त्यांच्यात वाद आहेत. फिर्यादी यांची मुलगी कॉमन नळावर पाणी भरण्यासाठी गेली असता आरोपी महिलेने तिला पाणी भरू दिले नाही.  फिर्यादी यांची पत्नी नळावर पाणी भरण्यासाठी गेली असता आरोपी महिलेने त्यांना शिवीगाळ व मारहाण केली. त्यानंतर आरोपींनी फिर्यादी यांना जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केली.

याच्या परस्पर विरोधात महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार विजय दाखले, सत्यवान दाखले आणि एक महिला यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपींमध्ये नळाच्या पाण्यावरून वाद आहे. आरोपी महिला फिर्यादी यांच्या घरात जाऊन ‘तू पाणी का भरते. तुझ्यामुळे मला पाणी भेटत नाही’ असे म्हणून फिर्यादी यांना घराबाहेर ओढत आणले. फिर्यादी यांना मारहाण करून त्यांच्याशी गैरवर्तन करत त्यांचा विनयभंग केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दोन्ही गुन्ह्यांचा तपास चिखली पोलीस करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button