पिंपरी / चिंचवड

मोई येथे दोन गटात वाद

पिंपरी l प्रतिनिधी

खेड तालुक्यातील मोई येथे दोन गटात वाद झाला. ही घटना रविवारी (दि. 13) दुपारी साडेपाच वाजता मोई येथे घडली. याप्रकरणी परस्पर विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

संतोष सखाराम गवारी (वय 38, रा. मोई, ता. खेड) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दिनेश कांताराम गवारी, प्रशांत भगवान भोंडवे, शिवानी डोंगरे आणि अन्य चार ते पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी फिर्यादी आणि त्यांचा भाऊ जालिंदर गवारी शॉपचे काम करत होते. त्यावेळी दिनेश गवारी तिथे आला. त्याच्या सोबत अन्य आरोपी होते. आरोपींनी लाकडी दांडे, लोखंडी रॉड आणि कोयत्याने फिर्यादी आणि त्यांच्या भावाला मारहाण केली. यात दोघेही जखमी झाले. मारहाण केल्यानंतर आरोपींनी जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

याच्या परस्पर विरोधात शिवानी सुधाकर डोंगरे (वय 22, रा. चिखली) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार संतोष गवारी, जालिंदर गवारी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सोबत आरोपींनी जमिनीवरून भांडण केले. संतोष गवारी याने दगडाने तर जालिंदर याने लाथाबुक्क्याने मारून फिर्यादीस जखमी केले. त्यानंतर शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दोन्ही गुन्ह्याचा तपास चाकण पोलीस करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button