breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

अनिल देशमुखांशी संबंधित छाप्यांची माहिती उघड करा

  • जयंत पाटील यांचे आव्हान

धुळे |

ईडी, सीबीआय आणि आयकर या यंत्रणा अधिकारी नव्हे तर, भारतीय जनता पक्षाचे राज्यकर्ते चालवितात. या यंत्रणांकडून वारंवार माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरावर छापे टाकले जात आहेत. आजपर्यंत टाकलेल्या छाप्यांमध्ये नेमके काय घबाड सापडले हे उघड करा, असे आव्हान जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी तपास यंत्रणांना दिले आहे. केंद्रीय पेट्रोलियम मंत्री यांनी करोना लस आणि इंधन दरवाढीचा संबंध जोडल्याचा धागा पकडत सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी करोना लस तुम्हांला केवढय़ात पडली हे घरी जावून तपासा, असे जनतेला सांगत केंद्राला टोला लगावला आहे. धनगर ठेलारी समाजाच्या प्रलंबित मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, ठेलारी महासंघाचे संस्थापक अध्यक्ष शिवदास वाघमोडे यांच्या उपस्थितीत साक्री शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात मंगळवारी सकाळी जिल्हास्तरीय मेळावा झाला. या मेळाव्यात महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केंद्रातील मोदी सरकारवर सडकून टीका केली.

या देशामध्ये शेतकर्यावर अत्याचार होत असल्याने त्याच्या निषेधार्थ राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील घटक पक्षांनी बंद पुकारल्यानंतर माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरावरड छापा टाकण्यात आला. अनेकवेळा छापा टाकणार्या यंत्रणेने काय सापडले हे सांगावे, असे आव्हानच पाटील यांनी दिले. करोना लस घेतल्यानंतर मिळणार्या प्रमाणपत्रावर मोदींचा फोटो असतो. लस मोफत असल्याने प्रमाणपत्र फोटोसह जनतेने स्वीकारले. पण आता पेट्रोलियम मंत्र्यांनी करोना लसीसाठी इंधन दरवाढ केल्याचे म्हटले आहे. त्यामुळे जनतेला जी लस दिली गेली. ती मोफत नव्हतीच हे स्पष्ट झाले आहे. यातून जनतेची फसवणूक झाली आहे. केंद्रातील भाजप सरकार ईडी आणि तपास यंत्रणांचा वापर करुन घेत आहे. तालुका पातळीवरील एखादा पोलिस ज्या प्रकारे कारवाई करतो त्याप्रमाणे इडीकडून कारवाई होत असल्याने हे सर्व हास्यास्पद असल्याची टीका पाटील यांनी केली.

धनंजय मुंडे यांनी धनगर आणि ठेलारी समाजाच्या सर्व संघटनांना एकत्र बोलवून समस्या जाणून घेवून त्यावर काम केले जाईल, असे सांगितले. शेतकरी आणि त्यांच्यावर अवलंबून असणार्याना नष्ट करण्याचा प्रयत्न मोदी सरकार करीत असल्याचा आरोप त्यांनी केला. धुळय़ाचे माजी आमदार अनिल गोटे यांनी भाजपमधील भ्रष्ट लोकांच्या नावांची यादी आपण आपल्या नेत्यांकडे दिली असल्याचे सांगितले. धुळे जिल्ह्यातही भ्रष्टाचारात बुडालेले काही जण असल्याचा उल्लेख करत गोटेंनी दोंडाईचा आणि जामनेरचा निर्देश केला. यावेळी भाऊसाहेब टिळे, पोपटराव सोनवणे, संजय बगदे, अविनाश लोकरे, शिवदास वाघमोडे, जितेंद्र मराठे आदी उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button