Uncategorizedताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारणराष्ट्रिय

थेट उद्धव ठाकरेंना आव्हान; एकनाथ शिंदे यांनी टाकला मोठा बॉम्ब, म्हणाले…

गुवाहाटी: गेल्या २४ तासाहून अधिक काळा महाराष्ट्रात सुरू असलेला सत्तासंघर्ष आणखी तीव्र होत चालला आहे. नाराज आमदारांसह भाजपचा गड असलेल्या आसाममध्ये पोहोचलेल्या एकनाथ शिंदे (Eknath Shinde ) यांनी आता त्यांची भूमिका आणखी स्पष्ट केली आहे. आपण दुसऱ्या पक्षात जाण्याचा निर्णय अद्याप घेतला नाही. त्याच बरोबर सत्तेसाठी बाळासाहेबांच्या विचारांशी तडजोड करणार नाही असे त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले. पण त्याच बरोबर शिंदे यांनी थेट पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर हल्ला चढवला आहे.

एका वृत्तवाहिनीशी बोलताना एकनाथ शिंदे यांनी काल शिवसेनेने घेतलेला निर्णय अवैध असल्याचे म्हटले आहे. एकनाथ शिंदे यांनी काल सोमवारी सूरत गाठल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी दुपारी बोलवलेल्या बैठकीत शिंदे यांना गटनेतेपदावरून काढून टाकण्याचा निर्णय घेतला होता. शिंदेच्या जागी अजय चौधरी यांची गटनेतेपदी निवड करण्यात आली होती. या निर्णयावर बोलताना शिंदे म्हणाले, गटनेतेपदाची झालेली निवड ही अवैध पद्धतीने झाली आहे. सर्व आमदारांना बोलवून बहुमताने गटनेता निवडला जातो. पण बहुमताचा आकडा आमच्या बाजूने आहे. त्यामुळे काल निवडण्यात आलेला गटनेता हा कायदेशी नाही असे शिंदे म्हणाले.

मी कोणाच्या विरोधात बोललो नाही किंवा अशी कोणतीही गोष्ट केली नाही जी चुकीची आहे. तरी देखील मला गटनेतेपदावरून हटवले, माझे पुतळे जाळले, माझ्याविरोधात आंदोलन करत आहेत आणि मला बदनाम केले जात आहे, हे योग्य नसल्याचे शिंदे म्हणाले.

गटनेतेपदासोबत शिंदे यांनी संजय राऊत यांनी केलेल्या आरोपाचे उत्तर दिले आहे. राऊतांनी असा आरोप केला होता की शिवसेनेच्या आमदारांना मारहाण करण्यात आली आणि त्याचे अपहरण करण्यात आले. यावर शिंदे यांनी सर्व आमदार माझ्यासोबत स्वखुशीने आहेत. आमदारांची नाराजी याआधी देखील मी मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवली असल्याचे ते म्हणाले.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button