breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन

दिलीप कुमार यांची प्रकृती स्थिर

मुंबई – बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने रविवारी सकाळी मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर सोशल मीडियावर त्यांच्या निधनाच्या अफवा पसरू लागल्या होत्या. मात्र आता दिलीप कुमार यांच्या टीमने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंवर दिलीप कुमार यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती दिली आहे.

दिलीप कुमार यांच्या टीमने म्हटलंय, ‘वॉट्सऍपवरील मेसेजेसवर विश्वास ठेवू नका. साहेबांची प्रकृती स्थिर आहे. मनापासून केलेल्या तुमच्या प्रार्थनांसाठी धन्यवाद. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार ते २-३ दिवसांत घरी परततील.’ दरम्यान, हे ट्विट सायरा बानो यांनी केल्याचं म्हटलं जातंय. तसेच ट्वीट करत सायरा बानो यांनी अफवा पसरवणाऱ्यांवर नाराजी व्यक्त केली आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button