दिघी, देहूरोड, चिखलीत दागिन्यांसह मोबाईल हिसकावला
पिंपरी चिंचवड | दिघी येथे वॉक करणा-या व्यक्तीचा मोबाईल फोन, तर देहूरोड आणि चिखली येथे दोन महिलांचे दागिने चोरट्यांनी जबरदस्तीने हिसकावून नेले. याप्रकरणी गुरुवारी (दि. 18) संबंधित पोलीस ठाण्यात अनोळखी चोरट्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.योगेश पोपटराव बेदरे (वय 40, रा. आळंदी) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादी बुधवारी रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास त्यांच्या घराजवळ चालत होते. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या तीन चोरट्यांनी फिर्यादी यांचा आठ हजारांचा मोबाईल जबरदस्तीने हिसका मारून चोरून नेला.देहूरोड पोलीस ठाण्यात 35 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. गुरुवारी (दि. 18) सकाळी सहा वाजताच्या सुमारास फिर्यादी महिला देहूरोड येथील इंद्रपूरम सोसायटी जवळ मॉर्निंग वॉक करत होती. त्यावेळी एका दुचाकीवरून आलेल्या दोन चोरटयांनी महिलेच्या गळ्यातील 30 हजारांची सोन्याची साखळी जबरदस्तीने चोरून नेली.चिखली पोलीस ठाण्यात 23 वर्षीय महिलेने फिर्याद दिली. गुरुवारी (दि. 18) रात्री आठ वाजताच्या सुमारास फिर्यादी महिला आकुर्डी-चिखलीरोड ने चालत जात होत्या. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या अनोळखी दोन चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील 45 हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र हिसका मारून तोडून चोरून नेले.