breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

महाराष्ट्र नावावर करून घेतलात की काय ? चित्रा वाघ अरविंद सावंतांवर भडकल्या

मुंबई – अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी लोकसभेत लेटरबॉम्ब आणि वसुली प्रकरणाचा मुद्दा उपस्थित केला. यानंतर शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी आपल्याला धमकवल्याचा आरोप नवनीत राणा यांनी केला. या प्रकरणी त्यांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहित कारवाईची मागणी केली देखील आहे. आता या प्रकरणात भाजप नवनीत राणा यांच्या पाठिशी उभी राहिल्याची दिसत आहे.

वाचा :-राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 25,04,327 वर

भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी ट्विट करून अरविंद सावंत यांच्यावर निशाणा साधला आहे. आम्ही जिजाऊ सावित्रीच्या लेकी आहोत, तुमच्या सारख्यांच्या धमक्यांना घाबरणाऱ्या नाही, असे ट्विट त्यांनी केले.

व्वा रे बहाद्दर….., महाराष्ट्र नावावर करून घेतलात की काय ?? अरविंद सावंत विचारलेल्या प्रश्नांची उत्तर द्या, धमक्या कसल्या देताय, आम्ही जिजाऊ सावित्रीच्या लेकी आहोत तुमच्या सारख्यांच्या धमक्यांना घाबरणाऱ्या नाही. नवनीत राणा ताई आम्ही सर्व तुमच्यासोबत आहोत, असे ट्विट चित्रा वाघ यांनी केले.

दरम्यान, “तू महाराष्ट्रात कशी फिरतेस मी पाहतो आणि तुला देखील तुरूंगात टाकू.” अशी शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी धमकी दिली असल्याचा आरोप खासदार नवनीत राणा यांनी लोकसभा अध्यक्षांना पाठवलेल्या पत्रात केलेला आहे. तर अरविंद सावंत यांनी स्वतःवरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button