breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

प्रविण दरेकरांनी ट्विट डिलीट केलं का?; स्क्रीनशॉट शेअर करत काँग्रेस नेत्याचा सवाल

मुंबई |

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण कायदा रद्द केल्यानंतर या मुद्द्यावरून राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा आरोप प्रत्यारोपाच्या फैरी सुरू झाल्या आहेत. मराठा आरक्षणावरून महाविकास आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस विरुद्ध भाजपा असं चित्र सध्या राज्यात दिसत आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजपाकडून सातत्याने ठाकरे सरकारवर आरोप केले जात आहेत. विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकरांनी असंच ट्वीट केलं होतं. त्याला काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी उत्तर दिलं. मात्र दरेकरांनी ट्वीट डिलीट केलं का?; असा प्रश्न सावंत यांनी स्क्रीनशॉट शेअर करून विचारला. राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा संवेदनशील बनला आहे. या मुद्द्यावरून राजकारणही तापलं असून, केंद्र आणि राज्य असे दावे प्रतिदावे केले जात आहेत.

याच मुद्द्यावरून काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाष्य केलं. होतं. त्याला प्रविण दरेकर यांनी उत्तर दिलं. दरेकरांनी केलेलं ट्विट रिट्विट करत सावंत यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं. “कंगना राणावतला भेटणारे पंतप्रधान छत्रपती संभाजी राजेंना का भेटत नाहीत? या साध्या प्रश्नाचे उत्तर प्रविण दरेकरांना व भाजपाला देता येत नाही. असो! उद्या पुन्हा मी भाजपाची पोलखोल करुन मराठा आरक्षणाविरुध्द भाजपाचा कुटील डाव उघड करणार आहे. त्याही प्रश्नापासून पळ काढतात का? ते पाहू,” असं सावंत म्हणाले होते. सावंत यांच्या ट्विटनंतर दरेकर यांनी त्यांचं ट्विट डिलीट केलं. डिलीट केलेल्या ट्विटचा स्क्रीनशॉट शेअर करत सचिन सावंत यांनी प्रश्ननही उपस्थित केला. “हे ट्विट माझ्या उत्तरानंतर सन्माननीय विरोधी पक्षनेते यांनी डिलीट केले का?,” असं सावंत म्हणाले. दरेकर यांनी केलेलं मूळ ट्विट त्यांच्या सोशल हॅण्डलवर दिसत नाही. ते त्यांच्या सोशल हॅण्डलवरून हटवण्यात आलं आहे.

दरेकर काय म्हणाले होते?

“‘उतावळा नवरा, गुडघ्याला बाशिंग’, अशी गत सध्या सचिन सावंत यांची झाली असून, कसलीही माहिती न घेता, ते मत ठोकून देतात. मराठा आरक्षण व छत्रपतींचा सन्मान कसा करतात हे भाजपाला शिकवू नका. आरक्षण वाचवणं जमलं नाही, आता किमान सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका तरी दाखल करा,” असं दरेकर यांनी डिलीट केलेल्या ट्विटमध्ये म्हटलं होतं.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button