breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमुंबई

‘ते’ पत्र खरचं परमबीर सिंह यांनीच पाठवले का? होणार शहानिशा…!

मुंबई – मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी तसेच मुकेश अंबानी स्फोट प्रकरणी ठाकरे सरकार हे बॅकफुटवर गेले आहे. या प्रकरणात मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची बदली करावी लागली. मात्र पोलीस अधिकारी परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केला आहे.

अनिल देशमुख यांनी प्रत्येक महिन्याला 100 कोटी रुपयांची वसुली करण्याचं टार्गेट सचिन वाझे यांना दिलं होतं, असा खळबळजनक दावा परमबीर सिंग यांनी केला आहे. परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना याबाबत पत्र लिहिलं

वाचा :-गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तात्काळ राजीनामा द्यावा : राज ठाकरे

परमबीर सिंह यांच्या या लेटर बॉम्बमुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी आक्रमकपणे होत आहे. दरम्यान हे पत्र परमबीर सिंह यांच्या मेलद्वारे मुख्यमंत्र्यां पाठवले गेले आहे. मात्र परमबीर सिंग यांच्या स्वाक्षरी नसलेल्या ईमेल पत्राबाबत आता शहानिशा करण्यात येणार असल्यकढे मुख्यमंत्री कार्यालयामार्फत सांगण्यात येत आहे.

गृहरक्षक दलाचे कमांडर जनरल परम बीर सिंग यांच्या नावाने मुख्यमंत्री सचिवालयाच्या अधिकृत इमेलवर आज दुपारी 4.37 वाजता पत्र प्राप्त झाले आहे. [email protected] या ईमेल पत्त्यावरून परम बीर सिंग असे केवळ नाव लिहिलेले व स्वाक्षरी नसलेल्या या पत्राचा ईमेल पत्ता तपासून घेण्यात येत आहे. त्याचप्रमाणे परम बीर सिंग यांना गृहविभागामार्फत संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

वास्तविक पाहता परम बीर सिंग यांनी अधिकृतरीत्या आयपीएस अधिकाऱ्यांच्या यादीसाठी दिलेला वैयक्तिक ईमेल पत्ता [email protected] असा आहे. त्यामुळे आज प्राप्त झालेला ईमेल तपासून घेणे आवश्यक आहे. असे मुख्यमंत्री कार्यालयामार्फत स्पष्ट करण्यात आले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button