पुणे

‘पाच वर्ष बापटांनी काय झोपा काढल्या का ?’, खासदारांच्या विरोधात राष्ट्रवादी आक्रमक

पुणे : खासदार गिरीश बापट यांनी रविवारी थेट आयुक्त विक्रमकुमार यांच्या घरावर धडक देत त्यांच्या घरातील पाण्याचा प्रेशर तपासले. यावेळी आयुक्तांच्या घरातील पाण्याचे स्प्रेशर ठीक आहे. पण त्यांना इतर प्रेशर खूप असल्याचे सांगत अप्रत्यक्षपणे राज्य सरकारच्या प्रेशरखाली आयुक्त काम करत असल्याची टीका केली.

यानंतर गिरीश बापट यांच्या भूमिकेचा जोरदार समाचार घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक नेते निलेश निकम यांनी महापालिका भवनासमोर आंदोलन करत भाजपच्या पाच वर्षातील गलथान कारभाराचा पाढा वाचत जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी बोलताना निलेश निकम म्हणाले की, “पाशवी बहुमत असताना तुम्हाला पुणेकरांचे प्रश्न सोडवता आले नाही. पाच वर्ष सत्तेत असताना खासदार गिरीश बापट झोपले होते का ?” असा घणाघात निलेश निकम यांनी केला आहे.
शिवाजीनगर भागात भाजपचे एक आमदार सिद्धार्थ शिरोळे आहेत. १२ नगरसेवक आहेत तरीदेखील काम करता आलं नाही आणि आता आयुक्तांच्या घरासमोर आंदोलन करता का ? असा सवाल देखील निकम यांनी केला आहे.

काय म्हणाले होते गिरीष बापट ?
शहरात सर्वत्र समान पाणी पुरवठा होणे आवश्यक आहे. याबाबत आयुक्तांशी चर्चा केल्यानंतर शहरात महापालिका ५ झोन तयार करून पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी टेक्निकल टीम नेमण्यात येणारं असून त्यांचे संपर्क क्रमांक लवकर घोषित करणार आहे. या सगळ्यावर एक अतिरिक्त आयुक्त लक्ष ठेवतील असे बापट यांनी सांगितले. तसेच शहरामध्ये २४ तास पाण्याच्या लाईन टाकण्याचे काम सुरू असून सर्वपक्षीय नगरसेवक यासाठी सहकार्य करतील असे अपेक्षा आहे. पुढील दोन दिवसात पाणी प्रश्न काही प्रमाणात कमी होईल अशी अपेक्षा आहे असं देखील बापट म्हणाले.

दरम्यान, पुणे शहरात कसबा, नाना पेठेसह अन्य भागांमध्ये कमी-जास्त दाबाने पाणीपुरवठा होत आहे. येत्या तीन दिवसांत शहराचा पाणीपुरवठा सुधारला नाही तर नागरिक रस्त्यावर येतील. असा इशारा खासदार गिरीश बापट यांनी कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत देऊन सभात्याग केला होता. त्यानंतर काल गिरीश बापट यांनी पुण्याच्या पाणीप्रश्नावर आक्रमक होत थेट आयुक्तांच्या घरावर धडक मारली होती.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button