breaking-newsTOP Newsताज्या घडामोडी

बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्रींनी भर दरबारात केला पतीच्या खूनाचा उलगडा; पाहा व्हिडीओ

Bageshwar Dham : बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री अलीकडच्या काळाता सातत्याने चर्चेत आहेत. दिव्यशक्ती आणि चमत्काराचे व्हीडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत असतात. आता धीरेंद्र कृष्णा शास्त्रींचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. एका गुरूग्राममधील महिलेच्या पतीच्या मृत्यूचा उलघडा धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी केला आहे.

गुरूग्राममधील महिलेच्या पतीचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे. त्या महिलेने ४ वर्षे झाले केसही धुतले नाहीत. महिलेच्या पतीचा खून झाल्याचा तिचं मत आहे. पण, पोलिसांनी याला आत्महत्या असल्याचं सांगितलं केलं आहे.

धीरेंद्र कृष्णा शास्त्री दरबारात आलेल्या लोकांमधून पतीच्या मृत्यूचं कारण जाणून घेण्यासाठी आलेल्या महिलेला स्टेजवर यावे, असं सांगितलं. त्यानुसार एक महिला समोर आली. तिच्याबरोबर पतीचा फोटोही होता.

यावर धीरेंद्र कृष्ण शास्त्री म्हणाले की, पतीच्या हत्येचं रहस्य जाणून घेण्यासाठी आला आहात. पतीचा खून झाला असून, नंतर आत्महत्या केल्याचा बनाव करण्यात आला आहे. शत्रू तुमच्या जवळपास फिरत आहेत. तुमच्यावर दबाव टाकला जात आहे. पतीच्या मृत्यूचं रहस्य समोर येत नाही आणि सीआयडी चौकशी होत नाही, तोपर्यंत तुम्ही आपले केस धुणार नाही.

यानंतर धीरेंद्र कृष्ण शास्त्रींनी म्हटलं की, या प्रकरणी सीआयडी चौकशी होईल. सध्या तुमचे केस धुवू नका. हनुमानजींची इच्छा असेल, तर लवकरच केस धुण्याची वेळ येणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button