breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

स्थानिक नगरसेवकांच्या प्रयत्नांमुळे प्रभाग १३ मध्ये अर्बन स्ट्रीट अंतर्गत रस्त्यांचा विकास…

  • महापौर ढोरे व आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते प्रकल्पाचे भूमिपूजन…
  • अत्याधुनिक रस्त्यांमुळे प्रभागाच्या वैभवात भर; चारही नगरसेवकांचे यश…

पिंपरी |

निगडी यमुनानगर प्रभाग १३ मध्ये लोकमान्य टिळक चौक ते दुर्गानगर पर्यंतचा रस्ता अर्बन स्ट्रीट अंतर्गत विकसित होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या प्रकल्पाचे भूमिपूजन आज शुक्रवारी (दि. ११) रोजी महापौर माई ढोरे, भोसरी विधानसभेचे आमदार महेशदादा लांडगे, मनसे गटनेते सचिन चिखले, नगरसेविका कमलताई घोलप, नगरसेविका सुमनताई पवळे, नगरसेवक उत्तम केंदळे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी पिंपरी चिंचवड शहर विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष शरद इनामदार, ज्येष्ठ नागरिक अण्णा अडी, अप्पा कुलकर्णी, विकास देशपांडे, भगवान श्राद्धे, बापु घोलप, गोरख कोलते, ए पी कुलकर्णी, शेखर आसरकर, गिरी देशमुख, आदित्य कुलकर्णी, प्रथमेश आंबेडकर, शिरीष जेधे, अनिल वाणी, प्रशांत बाराते, सारिका चव्हाण, विमल काळभोर, निलम गोलार, मकवाना ताई व प्रभागातील नागरिक उपस्थित होते.

नगरसेवक सचिन चिखले म्हणाले, पिंपरी चिंचवड महापालिकेने अर्बन स्ट्रीट डिझाईन अंतर्गत पादचा-यांच्या सुरक्षिततेसाठी शहरातील पदपथ विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याअंतर्गत पादचा-यांना चांगल्या सुविधा देण्यात येणार आहेत. त्या अनुषंगाने निगडी यमुनानगर प्रभाग १३ मध्येही ‘अर्बन स्ट्रीट’चा उपक्रम हाती घ्यावा. त्यामुळे प्रभागातील ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, मॉर्निंगसाठी जाणारा वर्ग यांना रहदारीच्या त्रासापासून मुक्तता मिळेल. तसेच प्रभागाच रुपडं पालटेल, अशी मागणी प्रभागातील स्थानिक नगरसेवकांना बरोबर घेऊन पालिका प्रशासनाकडे केली होती. अखेरीस प्रशासनाने आमच्या मागणीची दखल घेतली. या महत्वकांशी प्रकल्पामुळे निगडीकडून येणारी व त्रिवेणीनगर मार्गे भोसरीकडे जाणारी वाहतुक सुरळीत होण्यास मदत होईल. सायकल ट्रॅक आणि पदचारीद्वारे जाणारे नागरिक यांना सुरक्षितपणे मार्गक्रम करता येईल. रस्त्यांच्या बाजूला संमिश्र सायकलमार्ग तर ज्या ठिकाणी पुरेशी जागा उपलब्ध आहे, त्या ठिकाणी स्वतंत्र सायकल मार्ग पूर्ण क्षमतेने विकसित करण्यात येणार आहेत. स्मार्ट रोड अंतर्गत पदपथांवर कचऱ्याचे डबे, पादचाऱ्यांना बसण्यासाठी आसनव्यवस्था, रस्त्यालगतच्या बसथांब्यांची आकर्षक रचना प्रस्तावित आहे. या प्रकल्पामुळे निगडी व यमुनानगर प्रभागातील वैभवात भर पडेल. या मुख्य रस्त्याची लांबी १५३० मी व मुख्य रस्त्याची रुंदी २४.०० मी इतकी आहे. या कामासाठी पालिकेने १६ कोटी ५४ लाखांच्या खर्चाच्या निविदेला मंजूरी दिली आहे. या योजनेचे काम निखिल कंट्रक्शन हे १८ महिन्यांच्या आत मार्गी लावणार आहेत.

नगरसेवक उत्तम केंदळे म्हणाले, या आधुनिक रस्त्यांमुळे प्रभागातील लोकमान्य टिळक चौक ते दुर्गा नगर चौक वाहतुकीची कोंडी कमी होण्यास व पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत होईल. जेष्ठ नागरीक व विद्यार्थी यांच्यासाठी पदचारी मार्ग सुलभ होईल. नगरसेविका कमलताई घोलप म्हणाल्या, वाहतुक सुरळीत होईल व नागरीकांना जाण्यास मार्ग सोपा होईल. तर सुमनताई पवळे यांनी या कामामुळे निगडी व यमुनानगर भागातील शुशोभिकरण होण्यास मदत होईल, असे मत व्यक्त केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button