breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

अफगाणिस्तानात भारतानं केलेलं बांधकाम पाडा!; आयएसआयच्या तालिबानला सूचना

मुंबई |

अमेरिकेनं अफगाणिस्तानमधून परतण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता पुन्हा एकदा तालिबाबनं डोकं वर काढलं आहे. अफगाणिस्तानातील अनेक ठिकाणांवर तालिबाननं ताबा मिळवला आहे. जवळपास ८५ टक्के भागावर ताबा मिळवल्याचा दावा तालिबाननं केला आहे. त्याचबरोबर पाकिस्तानमधील हजारो दहशतवाद्यांनी तालिबानला पाठिंबा दिला आहे. त्यानंतर भारताने अफगाणिस्तान तयार केलेल्या इमारती पाडण्याच्या सूचना आयएसआय या पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेने दिले आहेत. गेल्या दोन दशकात भारतानं अफगाणिस्तानात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. भारतानं अफगाणिस्तानात २१८ किमी लांबीचा डेलराम ते झरांज सलमा डॅमपर्यंत रस्ता बांधला आहे. त्याचबरोबर २०१५ मध्ये अफगाणिस्तान संसद इमारतीचं काम पूर्ण करून लोकार्पण केलं होतं. अफगाणिस्तानातील भारतानं केलेली ही सर्वात मोठी कामं आहेत. भारतानं नवा अफगाणिस्तान उभारण्यासाठी मोलाची साथ दिली होती. खासकरून शिक्षणक्षेत्रात भारतानं योगदान दिलं होतं. शिक्षक आणि स्टाफला प्रशिक्षण देण्यासाठी पुढाकार घेतला होता.

जवळपास १० हजार पाकिस्तानी दहशतवाद्यांनी अफगाणिस्तानात जाऊन तालिबानला पाठिंबा दर्शवला आहे. त्याचबरोबर अशरफ गनी सरकारचा उघडपणे विरोधक केला आहे. पाकिस्तानी दहशतवादी आणि तालिबानला भारताने अफगाणिस्तानात तयार केलेलं बांधकाम पाडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे भारतीय गुप्तचर यंत्रणाही अफगाणिस्तानातील घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत.  “तालिबानसोबत युद्ध सुरु आहे. भारत-आफगाणिस्तान संबंध महत्त्वपूर्ण आहेत. भारताकडे अफगाणिस्तानने लष्करी मदत मागितलेली नाही. माझे पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत चांगले संबंध आहेत. भारतासोबत आमचे व्यापार आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सलोख्याचे संबंध आहेत.”, असं अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अशरफ गनी यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button