breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रमहाराष्ट्र

उपमुख्‍यमंत्री अजित पवार यांचा कोल्‍हापूर दौरा रद्‍द

कोल्‍हापूर – उपमुख्‍यमंत्री अजित पवार यांचा आजचा नियोजित कोल्‍हापूर दौरा रद्‍द झाला आहे. कोल्‍हापूर जिल्‍ह्यातील पूरस्‍थितीची पाहणी करण्‍यासाठी उपमुख्‍यमंत्री अजित पवार येणार होते. पण खराब हवामानामुळे ते कोल्हापूरला येऊ शकणार नाहीत.

सोमवारी सकाळी ते हेलिकॉप्‍टरने कोल्‍हापूरमध्‍ये येणार होते. मात्र साताऱ्यात जोरदार पाऊस सुरु आहे. खराब हवामानामुळे हेलिकॉप्‍टर टेक ऑफ होऊ शकले नाही. यानंतर ते रस्‍ते मार्गाने सांगली आणि त्‍यानंतर सोमवारी दुपारी कोल्‍हापूर जिल्‍ह्याचा दौरा करणार होते. पण त्यांचा कोल्हापूर दौरा रद्द झाला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button