पिंपरी / चिंचवड

गोडाऊन मधील कामगाराकडे दरमहा दोन हजारांची खंडणी मागत गोडाऊन जाळण्याची व जीवे मारण्याची धमकी

एकास अटक

पिंपरी l प्रतिनिधी

गोडाऊनमध्ये काम करणा-या कामगाराकडे दरमहा दोन हजार रुपयांची खंडणी मागितली. खंडणी न दिल्यास कामगाराला आणि त्याच्या मालकाला जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच आपली या भागात टोळी असून रात्रीत गोडाऊन जाळून टाकण्याची धमकी दिली. याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे. ही घटना रविवारी (दि. 17) दुपारी सव्वाचार वाजता लिंक रोड, पिंपरी येथे घडली.

कुणाल पप्पू इजगत (वय 23, रा. निराधारनगर, पिंपरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी रामदास ज्ञानोबा पवार (वय 54, रा. तापकीरनगर, काळेवाडी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे भारत सेल कार्पोरेशन या रवा मैदा ठेवण्याच्या गोडाऊनमध्ये काम करतात. रविवारी दुपारी सव्वाचार वाजता आरोपी तिथे आला. त्याने मला दरमहा दोन हजार रुपये हप्ता दिला नाहीतर मी तुला व तुझ्या शेठला जिवंत सोडणार नाही. माझी या भागात मोठी टोळी आहे, हे माहिती आहे का. माझी या भागात मोठी दहशत आहे. असे म्हणून हप्ता आत्ताच्या आत्ता पाहिजे असे म्हणत आरोपीने जोरजोरात गोडाऊनच्या गेटवर लाथा मारल्या. हप्ता दिला नाही तर गोडाऊन मधून एकही गाडी भरून जाऊन देणार नाही. गोडाऊन रात्रीचे जाळून टाकील असे म्हणत फिर्यादी आणि फिर्यादीच्या शेठला जीवे मारण्याची धमकी दिली. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button